राज ठाकरे महाराष्ट्र काबीज करू शकतील?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिल्याच जाहीर सभेत ठाकरी शैलीत अनेकांवर तोफ डागली.
Feb 13, 2013, 03:41 PM IST`बाळासाहेबांची इच्छा अपूर्णच, आपण तरी काय करणार!`
‘राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही बाळासाहेबांची आणि काही हितचिंतकांची इच्छा होती, मात्र ते दोघं एकत्र येत नाहीत, त्याला आपण तरी काय करणार’ अशी खोचक आणि तरिही सूचक अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलीय.
Feb 13, 2013, 03:24 PM ISTमाझा दौरा उभा महाराष्ट्र काबीज करण्यासाठीच- राज
आज कोल्हापुरातल्या गांधी मैदानात राज ठाकरे यांच्या दौऱ्यातील पहिलं भाषण केलं. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. आपल्याला होत असलेल्या जबड्याचा त्रास आणि सर्दी-खोकला यांच्यावर टिप्पणी करत भाषणाला सुरूवात केली.
Feb 12, 2013, 09:21 PM ISTआया-बहिणींवर हात टाकणाऱ्यांचे हात-पाय कलम करा - राज
`आमच्या आया-बहिणींवर हात टाकणाऱ्या या परप्रांतियांचे हात-पाय तिथल्या तिथे तोडून टाका` असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर ठाकरी शैलीत प्रहार केला.
Feb 12, 2013, 09:09 PM ISTराज ठाकरेंच्या कोल्हापूर भाषणातील ठळक मुद्दे
राज ठाकरे यांच्या कोल्हापुरातील सभेला तुफान गर्दी झाली. कोल्हापुरातील गांधी मैदानावर राज ठाकरेंचे भाषण सुरू झाले. राज ठाकरेंच्या सभेला प्रचंड उत्साह, राज ठाकरेंचा जयघोष सुरू होता.
Feb 12, 2013, 08:05 PM ISTराज ठाकरे कोल्हापूर सभेआधी महालक्ष्मीच्या चरणी
कोल्हापुरात आज संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महालक्ष्मीचं दर्शन घेतले आहे. राज ठाकरे यांची कोल्हापुरात आज जाहीर सभा आहे.
Feb 12, 2013, 02:13 PM ISTराज ठाकरेंची कोल्हापुरात आज तोफ धडाडणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज कोल्हापुरात धडाडणार आहे... महाराष्ट्राच्या राज्यव्यापी दौऱ्याची पहिली जाहीर सभा कोल्हापुरात राज ठाकरे घेणार आहेत.
Feb 12, 2013, 09:30 AM ISTसध्या गालावर टाळी वाजवतोय – राज ठाकरे
राज्यातील लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांना ज्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे, त्या प्रश्नाला आज पुन्हा राज ठाकरे यांनी बगल दिली आहे. शिवसेना-मनसे एकत्र येणार का? या ‘टाळी वाजणार का?’ असा प्रश्न साताऱ्यात पत्रकारांनी विचाराला पण आपल्या खास शैली राज ठाकरे यांनी पत्रकारांना उत्तर दिले.
Feb 11, 2013, 10:40 PM ISTमंत्र्याचे दुष्काळी दौरे भंपकपणा - राज ठाकरे
मंत्र्यांनी दुष्काळ भागात दौरे काढून काय साधले आहे. ना दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाना ना आधार. राजकीय नेते आणि मंत्र्यांनी केलेले दुष्काळी दौरे हे भंपकपणा आहे, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.
Feb 11, 2013, 02:34 PM ISTराज ठाकरे आज सांगलीत संवाद साधणार
महाराष्ट्राच्या दौ-यावर निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सांगलीतल्या पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे कालच सांगलीत दाखल झालेत.
Feb 11, 2013, 01:09 PM ISTगुरूची फाशी, राजकीय खेळी – राज ठाकरे
संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी अफझल गुरूला देण्यात आलेली फाशी ही केंद्र सरकारची राजकीय खेळी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
Feb 11, 2013, 09:15 AM IST`उद्धवदादू` दिलजमाई : राज काय बोलणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौ-याला आजपासून सुरुवात होतेय.आज राज ठाकरे सातारा दौ-यावर आहेत. दरम्यान, राज यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबईत एका कार्यक्रमात ‘दादू’ म्हटले होते. त्यामुळे `उद्धवदादू` यांच्या दिलजमाईनंतर राज काय बोलणार?, याचीच उत्सुकता आहे.
Feb 10, 2013, 09:46 AM ISTराज ठाकरे यांचा आजपासून राज्यव्यापी दौरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा आजपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात राज कोणाला टार्गेट करणार आणि काय बोलणार याची उत्सुकता आहे.
Feb 10, 2013, 08:33 AM ISTएंड्युरो स्पर्धेचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते
उद्या पुण्यामध्ये एंड्युरो स्पर्धा सुरू होत असून त्यात देशभरातले स्पर्धक सहभागी होत आहेत. या स्पर्धेचं उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरे करणार आहेत.
Feb 9, 2013, 12:02 AM ISTराज ठाकरेंच्या आदेशांचं झालं काय?
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बरीच अश्वासनं दिली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत मनसेच्या नगरसेवकांकडून कुठल्याच अश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचं दिसून आलं आहे.
Feb 8, 2013, 06:11 PM IST