`राज` तुला ठेवू तरी कुठं...
`इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधू आणि भगिनिंनो...` हे शब्द कानावर पडताच, संपूर्ण मैदानात एकच जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि मराठीची साद घालणाऱ्या नेत्याचा जयजयकार.
Feb 23, 2013, 10:06 PM ISTराज ठाकरे अजून लहान आहेत - शरद पवार
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अशा पोरकट टीकांवर लक्ष द्यायचं असतं का? दुष्काळाचे प्रश्न आहेत, इतर प्रश्न आहे ते महत्त्वाचे आहेत.
Feb 23, 2013, 08:56 PM ISTराज माझ्या काकामुळेंच मला किमंत आहे- अजित पवार
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या टीका, हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत. काल सोलापूरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेला आज अजित पवार यांनीही उत्तर दिलं आहे.
Feb 23, 2013, 08:19 PM ISTराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचे पोस्टर जाळले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजितदादा आणि आर. आर. आबा यांच्यावर केलेल्या टीकेचे संतप्त पडसाद सांगलीत उमटले आहेत.
Feb 23, 2013, 04:54 PM ISTसुशीलकुमार शिंदे तर राजकारणातील शशी कपूर- राज
‘सुशीलकुमार शिंदे म्हणजे राजकारणातील शशी कपूर सतत एकच, मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं एकच तुणतुणं सुरू…
Feb 22, 2013, 11:10 PM ISTअजित पवार नक्कल ही बेक्कलांची करावी लागते - राज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील सोलापूर मधील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली.
Feb 22, 2013, 09:07 PM ISTराज ठाकरेंची सोलापूर सभेत तुफान फटकेबाजी
अजित पवार मला फुकटचे सल्ले देऊ नका, काकांच्या जीवावर जगतो अजूनसुद्धा, एवढा मोठा झाला ५० वर्षाचा झाला तरी अजून काकांच्या जीवावर जगतोस, लाज वाटते का? – राज
Feb 22, 2013, 08:02 PM ISTराज ठाकरेंच्या सोलापुरातील सभेला तुडुंब गर्दी....
`महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौ-याचा दुसरा टप्पा सुरू झालाय. राज काल सोलापूरमध्ये दाखल झाले.
Feb 22, 2013, 06:28 PM ISTकेमिस्टचे आंदोलन थांबावा `नाहीतर खळ्ळखट्याक`
एफडीएच्या धोरणांविरोधात राज्यातल्या केमिस्टनी पुकारलेल्या आंदोलनाला मनसेनं जोरदार विरोध केलाय. हे आंदोलन मोडून काढण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत.
Feb 21, 2013, 10:42 AM ISTराज नाशिक सुधारा, मग राज्याचं बोला – अजित पवार
नकला करणे, भडक भाषणं करणे, प्रक्षोभक विचार मांडणे ही ठाकरे परिवाराची परंपरा आहे. ते शिवराळ भाषाही वापरतात, पण त्याने ना रोजगार मिळतो ना पाणी. आपल्याजवळ महाराष्ट्रा च्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असल्याचे ते सांगतात, पण आधी त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली नाशिकची महापालिका सुधारून दाखवावी, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.
Feb 20, 2013, 06:03 PM ISTउद्या `कृष्णकुंज`वर नगरसेवकांची तातडीची बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या मुंबईतील नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. सकाळी 10 वाजता राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
Feb 19, 2013, 07:41 PM ISTआबांनी घेतला ठाकरे बंधुंचा समाचार....
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी ठाकरे बंधूंकडून होणा-या टीकेचा समाचार घेतला आहे. कोल्हापूरच्या सभेत राज यांनी आर.आर.पाटील यांना इशारा दिला होता.
Feb 19, 2013, 02:40 PM ISTराज ठाकरे बोलबच्चन, राणे-राज संघर्षाची ठिणगी....
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खेडमध्ये टीका केल्यानंतर उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी राजविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे.
Feb 19, 2013, 12:29 PM ISTराजबद्दल योग्यवेळी बोलेन- उद्धव ठाकरे
राज ठाकरे उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देणार का याबद्दल सर्व महाराष्ट्राला उत्कंठा असतानाच राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘खो’ दिला. याबद्दल उद्धव ठाकरेंना विचारलं असता योग्य वेळ आल्यावर बोलू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
Feb 18, 2013, 11:00 PM ISTराज ठाकरेंची भाषणे भंपक – अजित पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणे आणि दौरे ही सगळी भंपकगिरी आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सोलापूर दौऱ्यात लगावला.
Feb 18, 2013, 06:55 PM IST