www.24taas.com, पुणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौ-याला आजपासून सुरुवात होतेय.आज राज ठाकरे सातारा दौ-यावर आहेत. दरम्यान, राज यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबईत एका कार्यक्रमात ‘दादू’ म्हटले होते. त्यामुळे `उद्धवदादू` यांच्या दिलजमाईनंतर राज काय बोलणार?, याचीच उत्सुकता आहे.
दौ-याला सुरुवात करण्याआधी राज यांनी मनसैनिकांसह बाप्पाला साकडं घातलं. पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं त्यांनी सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी मनसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून राजकीय भाष्य टाळणारे राज येत्या १२ तारखेला कोल्हापुरात राजकीय फटकेबाजीची पहिली माळ लावण्याची शक्यता आहे.
राज यांचा दौरा आजपासून सुरू होत असून त्यात त्यांच्या सात जाहीर सभा होणार आहेत. पहिलं भाषण ते कोल्हापुरात ठोकतील. `उद्धवदादू` यांच्या दिलजमाई प्रस्तावावर राज काय बोलतात याकडं मनसैनिकांचे आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
दरम्यान, शरद पवार आज जालना दौ-यावर येतायेत. तर राज ठाकरे पं. महाराष्ट्रात आहेत. सातारा जिल्हा दौ-यावर राज ठाकरे येतायेत. त्यामुळे दोघांच्या दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.