बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला नरेंद्र मोदी आणि राज यांची उपस्थिती
१७ नोव्हेंबर रोजी राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर श्रद्धांजली देण्यासाठी येणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थित राहाणार आहेत.
Nov 13, 2013, 01:59 PM ISTराज आणि उद्धव यांचं अनोखं `बंधुप्रेम`!
राज-उद्धवमध्ये सीझ फायर ? ...
गेल्या काही महिन्यांत दोघांची एकमेकांवर टीका नाही...
निवडणुकीआधी काय शिजतंय शिवसेना- मनसेत ?...
सेना-मनसेत तयार होतोय "अंडरस्टँडिंग" फॉर्म्युला ?...
राज ठाकरेंना कुराणाची डिजिटल प्रत भेट
मुंबईतील व्यापारी आणि मनसे उपाध्यक्ष असणाऱ्या हाजी अराफत शेख यांनी कुराणाचं बहुभाषिक डिजिटल व्हर्जन लाँच केलं आहे. या कुराणाची पहिली प्रत शेख यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेट दिली आहे.
Nov 6, 2013, 02:24 PM ISTठाकरे कुटुंबातील तीन दिग्गज व्यक्तीमत्त्व!
दिवाळीनिमित्त घेतलेल्या खास मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणी जागवल्या. श्रीकांत ठाकरे यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू राज ठाकरेंनी सांगितले.
Nov 3, 2013, 04:17 PM ISTलोहा नगरपालिकेनंतर ३ ग्रामपंचायतींवरही मनसेचं वर्चस्व
शहापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा २७ ऑक्टोबरला निकाल लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथंही मुसंडी मारलीय. मनसे पॅनलचे सदस्य तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाले आहेत. गोठेघर, वाफे आणि खुटघर ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वर्चस्व प्रस्तापित केलंय.
Oct 29, 2013, 11:37 AM ISTशिल्पासह राज कुंद्राची 'मातोश्री' आणि `कृष्णकुंज` वारी!
अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रा यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतंय.
Oct 28, 2013, 08:31 PM ISTलोहा नगरपालिका मनसेच्या ताब्यात
नांदेड जिल्ह्यातील लोहा पालिकेवर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडा फडकविला आहे. मनसेने १७ पैकी ९ जागेवर यश मिळवत काँग्रेसला धूळ चारली आहे. या विजयाने राज ठाकरे यांनी मराठवाड्यात पहिली नगरपालिका जिंकण्याचा कारनामा करू दाखविला आहे.
Oct 28, 2013, 02:53 PM IST‘शर्ट इन’ केलेले पवार... राज ठाकरेंच्या कुंचल्यातून!
राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे व्यंगचित्र रेखाटले आणि उपस्थितांना प्रथमच इन शर्ट केलेले पवार यानिमित्तानं पाहायला मिळाले.
Oct 21, 2013, 09:09 PM ISTज्याची पुस्तक विक्री जास्त; त्यालाच करा अध्यक्ष - राज
‘...याला मराठी साहित्य संमेलन आहे की कुस्तीचा आखाडा’ अशी टीका राज ठाकरेंनी साहित्य संमेलनाच्या राजकारणावर आणि नेहमीच्याच वादावर केलीय. सोबतच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. ते पुण्यात बोलत होते.
Oct 17, 2013, 08:05 PM ISTजाणून घ्या... शिवसेनेतल्या ‘बंडखोरां’चा इतिहास!
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अपमानित होऊन व्यासपीठावरून घरी जावं लागलं.
Oct 15, 2013, 06:13 PM ISTराज आणि उद्धवची “अळीमिळी, गुपचिळी”
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बहुधा अलिखित करार झालाय की काय अशी शंका येऊ लागलीय. एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोघे ठाकरे चुलत बंधू सध्या एकमेकांविरूद्ध टीका करणं टाळत असल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.
Oct 14, 2013, 08:51 PM ISTसेनेचे प्रमोदनाना भानगिरे, राष्ट्रवादीचे सुनील टिंगरेही मनसेत!
शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी या दोघांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.
Oct 14, 2013, 07:53 PM ISTसंजय घाडी, राजा चौगुले पुन्हा मनसेत
शिवसेनेचे उपनेते संजय घाडी आणि राजा चौगुले यांनी अखेर पुन्हा मनसेत प्रवेश केलाय. आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे दोघे मनसेत डेरेदाखल झाले.
Oct 14, 2013, 12:22 PM ISTनागरिकांची इच्छा तरच क्रीडा संकुल उभे राहील- राज
नरे पार्कवर क्रीडा संकुल व्हावं ही जर नागरिकांची इच्छा असेल, तरच इथे वास्तू उभी राहील असं राज यावेळी म्हणाले.
Oct 13, 2013, 03:07 PM ISTजोशी यांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही - राज ठाकरे
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करण्याच नकार दिलाय.
Oct 12, 2013, 02:39 PM IST