Maha Shivratri 2025: हिंदू धर्मात महाशिवरात्री हा महत्त्वाचा आणि विशेष सण आहे. वैदिक कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी तिथीला साजरी करण्यात येते. यावेळी महाशिवरात्री बुधवार, 26 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस देवांचा देव महादेव यांना समर्पित असून या दिवशी भाविक उपवास करतात आणि भोलेनाथाची पूजा करतात. महादेवाची पूजा केल्याने दुःख दूर होते. रोग आणि दोषांपासून मुक्तता मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे. यावेळी विशेष म्हणजे, यावेळी शिवरात्रीच्या दिवशी त्रिग्रही युती योग निर्माण होणार आहे. ज्योतिष शास्त्रज्ञांच्या मते, असा एक अद्भुत योगायोग 60 वर्षांपूर्वी घडणार आहे.
यावेळी महाशिवरात्रीला अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य, चंद्र आणि शनि यांचा एक विशेष त्रिग्रही योग तयार होत आहे. हा योग यश आणि समृद्धीचे प्रतीक आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग आणि सिद्धयोगाचा संयोग मानला जातोय. या योगांमध्ये पूजा केल्याने इच्छा लवकर पूर्ण होतात. याशिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी अमृत सिद्धी योग देखील आहे. या योगात केलेल्या कामाचे आणि उपवासाचे फळ अनेक पटींनी जास्त असतात.
मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री आनंदच आनंद घेऊन आला आहे. महाशिवरात्रीपासून लोकांना पदोन्नती मिळेल आणि पगारवाढ होणार आहे. या राशीच्या लोकांना जे काही काम करायचे आहे त्यात यश मिळेल. व्यवसायासाठी बनवल्या जाणाऱ्या योजना देखील सुरळीतपणे पुढे जाणार आहे. नवीन संधी तुमची आर्थिक स्थिती मजबूत करणार आहे. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे.
महाशिवरात्रीचा सण मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना नवीन काम सुरू करण्याची योजना आखणार आहात. व्यवहारात फायदा होणार आहे. व्यवसायातील तुमचे नियोजन तुम्हाला दीर्घकाळात चांगले परिणाम देणार आहे. महाशिवरात्रीला शिव आणि शनीच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे.
महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथ सिंह राशीच्या लोकांवर आपला आशीर्वाद वर्षाव करणार आहे. महाशिवरात्रीला घडणारे दुर्मिळ योगायोग तुमचा प्रगतीचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न करतील. या काळात पगारात वाढ होण्याची शक्यता देखील आहे. शिवरात्री दरम्यान तुम्ही वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता. या काळात पैशाची आवक वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात बऱ्याच काळापासून सुरू असलेला कलहही दूर होईल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)