मुंबई : आयपीएलमध्ये खराब परफॉर्मन्स विराट कोहलीची पाठ काही सोडत नाहीये. पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यात देखील तो अवघ्या 20 रन्सवर माघारी परतला. दरम्यान कालच्या सामन्यात एक मजेदार किस्सा घडला होता. यावेळी सामना सुरु असताना एक काळं मांजर मैदानात घुसलं होतं. मात्र या मांजरावरून विराटच्या डोक्याला ताप झाला आहे.
या काळ्या मांजरीमुळे सोशल मीडियावर विराट कोहलीला ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी काळ्या मांजरीमुळे विराट कोहलीचा परफॉर्मन्स असल्याचं युझर्सने म्हटलं आहे.
सोशल मीडियावर एका युझरने म्हटलंय की, कोहली, तुला नजर लागू नये असं वाटत असेल तर प्लीज तुझे ट्विटरवर वर्कआऊटचे व्हिडीयो आणि फोटो शेअर करणं बंद कर. किंवा ही काळ्या रंगाची मांजर पाळ. त्यामुळे आता विराट कोहली ही मांजर पाळणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
That black cat evil magic was planted. #IPL
— cricBC (@cricBC) May 13, 2022
Dear #Kohli , if you want to prevent evil eyes , either you stop posting workouts on twitter or else adopt a Black cat #IPL #IPL2022 #RCBvsPBKS #RCBvPBKS pic.twitter.com/x4innvWIlp
— cricketistan (@cricketisthan) May 13, 2022
I think this black cat is the reason for the lack of form of @imVkohli it showed itself today. #RCBvsPBKS #PKBSvsRCB #IPL #ViratKohli @RCBTweets pic.twitter.com/OgG2MUa6Pr
— Dr Nirmal Jyothi (@majornirmal) May 13, 2022
काहींनी काळ्या मांजरीचा संदर्भ जादू टोण्याशी केला आहे. या युजरच्या म्हणण्यानुसार, काळी मांजर ही जादू टोण्यासाठी वापरली जाते. तर अजून एका युझरने ट्विट केलं आहे की, मला वाटतं या काळ्या मांजरीमुळेच विराटचा परफॉर्मन्स खराब झाला आहे.
काळ्या रंगाची मांजर चक्क मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये घुसली. ही मांजर नुसती घुसली नाही तर काहीवेळ ती मॅच पाहात होती. इकडे तिकडे पाहून झाल्यानंतर ती जागेवरून उठली आणि ती स्टेडियममध्ये फिरायला निघाली. हा संपूर्ण प्रकार पंजाब विरुद्ध बंगळुरू सामन्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.