Ranji Trophy: भारतीय टीमचा स्टार खेळाडू विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. कोहली लवकरच रणजी ट्रॉफी सामना खेळताना दिसणार आहे. तब्ब्ल १३ वर्षानंतर विराट या सामन्यात खेळताना दिसणार आहे. कोहलीने शेवटचा रणजी सामना 2012 मध्ये खेळला होता. गाझियाबादमध्ये त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध शेवटचा रणजी सामना खेळला. हा सामना 30 जानेवारीपासून होणार आहे. यामध्ये कोहली खेळताना दिसणार आहे. याशिवाय रोहित शर्माही रणजी ट्रॉफी सामना खेळताना दिसणार आहे. रणजी करंडक स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली असून त्यात रोहित शर्मा सोबत विराट कोहलीचाही समावेश करण्यात आला आहे.
विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाकडून खेळताना दिसणार असल्याची माहिती समोर येत आहेत. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (DDCA) सूत्रांनी इंडिया टुडेला ही माहिती दिली आहे. सूत्रांनुसार, कोहलीने डीडीसीएला सांगितले की तो रेल्वेविरुद्धच्या सामन्यात उपलब्ध असेल. दिल्ली संघाला 30 जानेवारीपासून रेल्वेविरुद्ध हा सामना खेळायचा आहे. कोहली हा सामना खेळताना दिसणार आहे.
हे ही वाचा: 'या' खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार रोहित शर्मा...मुंबईचा संघ जाहीर
विराट कोहली मानेमध्ये समस्या असल्याने तो सहाव्या फेरीत खेळत नाही. जर कोहली रेल्वेविरुद्धच्या सामन्यात खेळला तर त्याचा 13 वर्षांतील पहिला रणजी सामना असेल. दिल्ली संघ आपला पुढचा सामना रणजीमध्ये 23 ते 25 जानेवारी दरम्यान राजकोटमध्ये सौराष्ट्र विरुद्ध खेळणार आहे. कोहली हा सामना खेळणार नाही.
हे ही वाचा: रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची भेट कशी झाली? जाणून घ्या रिंकू सिंगची फिल्मी लव्हस्टोरी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार सर्व केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले आहे. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर मुंबईकडून खेळत आहेत. तर शुभमन गिल पंजाबकडून खेळणार आहे.
हे ही वाचा: Video : बांगलादेशी प्रेक्षकांकडून हिंदू क्रिकेटरचा अपमान, Live मॅचमध्ये जे घडलं ते पाहून संताप होईल
कोहलीचा रेड बॉल फॉरमॅटमध्ये खराब फॉर्म आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये पर्थ कसोटीत त्याने शतक झळकावले. तर त्याने 9 डावात 23.75 च्या सरासरीने 190 धावा केल्या. त्याच्या या फॉर्ममुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे.