'माइंड रिसेट आणि...', खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला एका खास मित्राचा सल्ला!

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्याकडून भरपूर धावा होतील अशी सर्वांना अपेक्षा होती, पण त्याची बॅट शांत राहिली. आता एका खास मित्राने कोहलीला सल्ला दिला आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 6, 2025, 08:10 AM IST
'माइंड रिसेट आणि...', खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला एका खास मित्राचा सल्ला! title=

Virat Kolhi: 2024 हे वर्ष भारटाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी काही खास नव्हते. विराटने एकूण 23 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने सरासरीने केवळ 21 धावा केल्या. एवढेच नाही तर कोहलीने वर्षभरात केवळ एकच शतक झळकावले. याशिवाय वर्षअखेरीस झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कोहली पुनरागमन करेल आणि भरघोस धावा करेल, अशी अपेक्षा होती.  पण त्याच्या पदरी निराशाच पडली. 5 सामन्यांच्या या मालिकेतही कोहली फॉर्ममध्ये दिसला नाही.
आता 2025 वर्ष सुरू झाले आहे आणि वर्षाच्या सुरुवातीलाच कोहलीच्या खास मित्राने त्याला त्याच्या खराब फॉर्मवर मात करण्याचा सल्ला दिला आहे.

विराट कोहलीला मिळाला सल्ला 

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आणि विराटचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी सहकारी एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीला त्याच्या खराब फॉर्मवर मात करण्यासाठी खास सल्ला दिला आहे. त्याने विराटला आपले माइंड 'रीसेट' करण्याचा सल्ला दिला. याशिवाय त्याने मैदानावर कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नये असाही सल्ला दिला आहे. कोहली आणि रोहित शर्मा यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धावा काढण्यासाठी संघर्ष केला, ज्यामुळे भारताने पाच सामन्यांची मालिका 1-3 ने गमावली. कोहलीने या मालिकेतील 9 डावात केवळ 190 धावा केल्या. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत तो वारंवार बाद होत होता.

हे ही वाचा: Video: 62 चेंडूत संपला कसोटी सामना, ठरली रक्तरंजित मॅच; खेळपट्टीवर फलंदाज रक्तबंबाळ!

 

डिव्हिलियर्स नक्की काय म्हणाला?

डिव्हिलियर्सने X वर लिहिले, 'माझा विश्वास आहे की मुख्य गोष्ट म्हणजे तुमचे माइंड नेहमी 'रीसेट' करणे. विराटला कोणाशीही भिडायला आवडते, पण जेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्ममध्ये असता तेव्हा अशा गोष्टींपासून दूर राहणे चांगले. एक फलंदाज म्हणून स्वत:ला नव्याने तयार करणे महत्त्वाचे आहे. गोलंदाज कोणीही असो प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो.' 

हे ही वाचा: हिटमॅन निवृत्ती घेणार? रोहित शर्माने स्वतःच केलं स्पष्ट, म्हणाला..."काय निर्णय घ्यायचा..."

2025 मध्ये पाऊस पडेल!

2025 मध्ये कोहलीने खूप धावा केल्या पाहिजेत अशी चाहत्यांचीच अपेक्षा नाही, तर क्रिकेटच्या मैदानावर हे वर्ष त्याच्यासाठी चांगले जावे अशी विराटची  स्वतःची इच्छा आहे. कोहलीची नजर इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेवर आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर असेल. याशिवाय भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. कोहली या संघाचा भाग असेल की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.