Video: याला म्हणतात Top Class Spin बॉलिंग... 3 बॉलमध्ये 2 विकेट्स पण रिपीट टेलिकास्ट वाटावं इतकं साम्य

Video Varun Chakravarthy Bowling: सोशल मीडियावर भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पहिल्या टी-20 सामन्यामधील हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 23, 2025, 09:12 AM IST
Video: याला म्हणतात Top Class Spin बॉलिंग... 3 बॉलमध्ये 2 विकेट्स पण रिपीट टेलिकास्ट वाटावं इतकं साम्य title=
सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडीओ

Video Varun Chakravarthy Bowling: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या टी-20 मालिकेतील पाहिला सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला. एकतर्फी सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत मोठा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला कमी धावसंख्येवर रोखण्याचं महत्त्वाचं काम भारतीय गोलंदाजांनी केलं. त्यातही भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आपल्या कामगिरीने सामन्यावर छाप पाडली. सध्या वरुण चक्रवर्तीचा या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स

वरुण चक्रवर्तीने इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन या दोघांना एकाच ओव्हरमध्ये तंबूत पाठवलं. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या संघाची अडखळती सुरुवात झाल्यानंतर उरलेली कसर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी भरुन काढली. फिरकीपटुंच्या गोलंदाजीवरही इंग्लंडच्या खेळाडूंना धावा करताना अडचणी येत होत्या. त्यातच वरुण चक्रवर्तीने अनेक निर्धाव चेंडू टाकत फलंदाजांवरील प्रेशर वाढवलं. त्यामुळेच एकाच ओव्हरमध्ये त्याला दोन विकेट्स घेता आल्या.

3 चेंडूंच्या अंतराने दोन विकेट्स

आधी हॅरी ब्रूक आणि नंतर लियाम लिव्हिंगस्टोनला अवघ्या 3 चेंडूंच्या अंतराने वरुणने तंबूत पाठवलं. सामन्यातील आठवड्या ओव्हरमध्ये वरुणने आधी हॅरी ब्रूकला (14 चेंडूंमध्ये 17 धावा) आणि नंतर लियाम लिव्हिंगस्टोनला (2 चेंडूंमध्ये 0 धावा) बाद केलं. यानंतर इंग्लंडच्या संघाला सावरताच आलं नाही. ब्रूक आणि लियामला वरुणने टाकलेले बॉलच कळले नाही. दोघेही एकापाठोपाठ एक बोल्ड झाले. बीसीसीआयच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन वरुणच्या या कामगिरीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

इतर गोलंदाजांचीही उत्तम कामगिरी

वरुणाने या सामन्यामध्ये 4 ओव्हरमध्ये  23 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने 44 धावांमध्ये 68 धावांची खेळी करत इंग्लंडला किमान सन्मानजक धावसंख्येपर्यंत पोहचवलं. मात्र जोसलाही वरुणानेच नितीश कुमार रेड्डीच्या मदतीने झेलबाद केलं. वरुणबरोबरच अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल या तिघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत उत्तम कामगिरी केली. भारताच्या केवळ रवि बिश्नोईला एकही विकेट घेतला आली नाही.

केकेआर कनेक्शनमुळे संधीची चर्चा

वरुण चक्रवर्ती हा आयपीएलमध्ये कोलकात्याच्या संघाकडून खेळतो. गौतम गंभीरने प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर वरुणला पुन्हा टी-20 संघात स्थान देण्यात आलं. त्याने या संधीचं सोनं केल्याचं या आधीच्या सामन्यांमध्येही दिसून आलं आणि बुधवारीही त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली.