Aurangzeb Tomb In Maharashtra Sambhaji Nagar : स्वराज्याचा छावा, स्वराज्यासाठी बलिदान देणारा असामान्य योद्धा, धैर्य, पराक्रम, असमान्य शौर्य, धर्माभिमान असलेला राजा... छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीवर आधारीत छावा (Chhava) चित्रपट पाहताना अंगावर शहारे येतात. या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये संतापाने पेटून उठलेला औरंगजेब जमीनवर कोसळ्याचे पहायला मिळते. मात्र, प्रत्यक्षात औरंगजेबाचा मृत्यू कधी कुठे आणि कसा झाला? महाराष्ट्रात औरंगजेब कबर कुणी आणि का बांधली? जाणून घेऊया इतिहास.
शाहजहान आणि मुमताज यांचा तो तिसरा मुलगा मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब. ‘अबुल मुझफ्फर मुई-उद-दिन मुहंमद’ असे त्याचे संपूर्ण नाव आहे. 3 नोव्हेंबर 1618 रोजी दोहादमध्ये औरंगजेब याचा जन्म झाला. भारतीय उपखंडातल्या 15 कोटी लोकसंख्येवर 49 वर्षं औरंगजेबने राज्य केलं. मात्र, त्याचा मृत्यू अत्यंत भयानक रित्या झाला.
संगमेश्वरच्या कसबा गावात छत्रपती संभाजी महाराज यांना मुघलांनी कैद केलं. तेथून त्यांना धर्मवीरगडावर म्हणजेच बहादुरगडावर नेण्यात आले. राजांना धर्मांतर करण्यास सांगितले गेले. धर्मांतर केले तरच जीवदान देऊ असेही सांगण्यात आले. राजानी धर्मांतर करण्यास विरोध केली. यानंतर औरंगजेबने अतिशय क्रूरपणे शंभूराजांची हत्या केली. पण मराठ्यांचा लढा थांबला नाही. छ.राजाराममहाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांचा संघर्ष सुरुच राहिला. मराठ्यांचा अस्त करणं आता जवळपास अशक्य आहे हे औरंहजेबच्याही लक्षात आले.
औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो. 1659 साली औरंगजेबने शाहजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. यामुळे त्याची मुलही औरंगजेबच्या मृत्यूची वाट पाहत होते. औरंगजेब मृत्यूच्या शेवटच्या दिवसांत तडफडत होता. आयुष्यभर केलेल्या क्रूरपणा आणि पापाचे पश्चाताप करत होता.
मी सव्वाशे वर्ष जगेन असा दावा करणारा औरंगजेब याचा मृत्यू वयाच्या 89 व्या वर्षीत नैसर्गिकरीत्या झाला. 1707 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगरजवळील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूवर रडण्यासाठी त्याची मुलगी सोडता आणखी कुणीच नव्हते. अहमदनगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला.
आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशाहनं ही कबर बांधली. औरंगजेब गुरू मानत असलेल्या सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधण्यात आली. झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे. आपल्या मृत्यूची चाहूल लागलेल्या औरंगजेबाने त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं. त्यात त्याने कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे देखील लिहीले होते. औरंगजेबानं आपली कबर फक्त 14 रुपये 12 आणे एवढ्याच खर्चात बनवायची असं मृत्यूपत्रात लिहीले होते. औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथुन दिल्ली कडे पोबारा केला. त्याच्या उरलेल्या 3 मुलांमधे सत्तेसाठी यादवी युद्ध झाले. इथुनच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली.