Indian Army Recruitment: भारतीय सैन्यात काम करावे अशी अनेकांची इच्छा असते. देशसेवा करण्यासोबत एक सन्मानाची चांगल्या पगाराची नोकरी याद्वारे मिळते. तुम्हीदेखील भारतीय सैन्यातील नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. भारतीय सैन्यात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
भारतीय लष्कराकडून अविवाहित पुरुष आणि महिलांसाठी एनसीसी स्पेशल स्कीम अंतर्गत भरती सुरु आहे. इंडियन आर्मीने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (नॉन-टेक्निकल) साठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. भारतीय सैन्याच्या या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 70 रिक्त पदे भरली जाणार आहेत. जर तुमच्याकडे या पदांशी संबंधित पात्रता असेल तर खालील मुद्दे काळजीपूर्वक वाचून अर्ज करा. भारतीय सैन्यात पुढील पदांवर पुनर्नियुक्ती केली जाणार आहे. याअंतर्गत एनसीसी पुरुष (सामान्य) ची 63 पदे, एनसीसी पुरुषची 7 पदे,एनसीसी महिला (सर्वसाधारण) ची 5 पदे, एनसीसी महिलांचे 1 पद भरले जाणार आहे.
या रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 19 वर्षे तर कमाल वय 25 वर्षे इतके असावे. उमेदवारांच्या वयाची गणना 1 जुलै 2025 पर्यंत केली जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
भारतीय सैन्यात नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. असे असले तरी मागील वर्षांमध्ये त्या उमेदवाराने एकूण 50% गुण मिळवले असणे आवश्यक आहे.
भारतीय सैन्यात निवड झाल्यावर उमेदवारांना त्यांच्या पद आणि लेव्हलनुसार 56 हजार 100 ते 2 लाख 50 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.
सर्वप्रथम उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. भारतीय सैन्य एकूण गुणांच्या आधारे उच्च कट-ऑफ सेट करू शकते. यानंतर एसएसबी मुलाखत होईल. शॉर्टलिस्टेड उमेदवारांना प्रयागराज, भोपाळ, बेंगळुरू आणि जालंधर येथील निवड केंद्रांवर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. एसएसबीमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल. सर्वात शेवटी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.एसएसबीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते.
जर तुम्हीही या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकता. 15 मार्च ही अर्जाची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.