Hardik Pandya वरही 'पुष्पा'चा फिव्हर , Srivalli गाण्यावर आजीसोबत डान्स, पहा मजेदार Video

हार्दिक पांड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

Updated: Jan 26, 2022, 07:14 PM IST
Hardik Pandya वरही 'पुष्पा'चा फिव्हर , Srivalli गाण्यावर आजीसोबत डान्स, पहा मजेदार Video title=

Hardik Pandya Dance on Pushpa: 'पुष्पा' चित्रपटाची क्रेझ सध्या सर्वांनाच आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांना यावर आपले व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरलेला नाही. क्रिकेटर्सही यापासून दूर राहिलेले नाहीत. रवींद्र जडेजा, सुरेश रैना अगदी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही पुष्पा चित्रपटाच्या गाण्यावर व्हिडिओ बनवले आहेत. यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. 

दुखापतीनंतर पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेला स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्रामवर सतत व्हिडिओ आणि फोटो शेअर करून तो नेहमीच चर्चेत असतो. नुकताच हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर आपला एक व्हिडिओ टाकला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या 'पुष्पा: द राइज' या दक्षिण भारतीय चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर आजीसोबत नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हार्दिक आणि त्याची आजी दोघांनी चष्मा लावला आहे आणि ते चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहेत.

हार्दिक पांड्याने व्हिडिओसोबत लिहिलंय 'आमच्या पुष्पा नानी'. या पोस्टवर हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्यानेही हार्ट इमोजी टाकून उत्तर दिलं आहे. कृणालची पत्नी आणि हार्दिकच्या पत्नीनेही कमेंट केली आहे. क्रिकेटर इशान किशनने या व्हिडिओला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट व्हिडिओ म्हटलं आहे.

आयपीएलमध्ये कर्णधाराच्या भूमिकेत
आयपीएलच्या पुढील हंगामासाठी अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिकला संघाचा कर्णधार बनवलं आहे. माझ्या नेतृत्वाखाली संघातील वातावरण योग्य प्रकारे राखलं जाईल, ज्यामध्ये खेळाडूंवर कोणतंही दडपण नसेल, अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्याने दिली होती.

हार्दिकाला पाठिची दुखापत
हार्दिक पांड्याच्या पाठीवर दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या वर्षी हीच दुखापत पुन्हा सुरु झाली. यानंतर हार्दिक पांड्याच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिकने खूपच कमी गोलंदाजी केली आहे. फलंदाजीतही तो कमाल दाखवू शकला नाही. टी-20 विश्वचषकातील त्याच्या कामगिरीवरही जोरदार टीका झाली. मात्र, आता हार्दिक पुढील आयपीएल हंगामात कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे.