मुंबई : ऑलिम्पिक मेडलिस्ट बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधू आता अजून एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारलेल्या सिंधूचा गोल्ड मेडलसाठी जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याशी मुकाबला रंगणार आहे.
सिंधूनं २०१३ आणि २०१४ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडलला गवसणी घातली आहे. आजच्या लढतीत जर सिंधूचा पराभव झाला तर तिला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागेल.
वर्ल्ड चॅम्पियनशिप गोल्ड किंवा सिल्व्हर मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरेल. दरम्यान सायना नेहवाललाही वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडलवरच समाधान मानावं लागलंय.