रोहित शर्माने मॅच जिंकल्यावर ओडिशाच्या CM सोबत केलं असं काही, फॅन्स पाहतच राहिले Video Viral

IND VS ENG 2nd ODI : सामना जिंकल्यावर उत्साहाच्या भरात रोहित शर्माने ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या सोबत असे काही केले जे पाहून सर्वच थक्क झाले. 

पुजा पवार | Updated: Feb 10, 2025, 02:44 PM IST
रोहित शर्माने मॅच जिंकल्यावर ओडिशाच्या CM सोबत केलं असं काही, फॅन्स पाहतच राहिले Video Viral title=
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG 2nd ODI : ओडिसा येथील कटक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) वनडे सीरिजमधील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) दमदार शतक ठोकून टीम इंडियासाठी विजयी खेळी केली. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेले 305 धावांचे आव्हान पूर्ण करून सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली. यात रोहितला प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळाला. सामना जिंकल्यावर उत्साहाच्या भरात रोहित शर्माने (Rohit Sharma) ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या सोबत असे काही केले जे पाहून सर्वच थक्क झाले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

9 फेब्रुवारी रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसऱ्या सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. यावेळी टीम इंडियाच्या बॉलींग अटॅक समोर त्यांनी 10 विकेट्स गमावून 304 धावांची खेळी केली. त्यानंतर टीम इंडियासमोर विजयासाठी 305 धावांचे आव्हान असताना टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहितने 119 धावांची खेळी केली, तर शुभमन गिलने 60 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 44 आणि अक्षर पटेलने नाबाद 41 धावा केल्या. भारताने 6 विकेट्स गमावून 308 धावा केल्या आणि 4 विकेट्सने इंग्लंडवर विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाने तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये 2-0  अशी आघाडी घेतली. 

रोहित शर्मा बॅक इन फॉर्म : 

रोहित शर्माने 76 बॉलमध्ये शतक ठोकले. मागील अनेक महिन्यांपासून रोहित शर्मा खराब फॉर्ममधून जात होता. टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सीरिज दरम्यान तो 3 सामन्यात 6 इनिंगमध्ये 40 धावा सुद्धा करू शकला नव्हता. रणजी ट्रॉफीतील सामन्यातही तो फेल ठरला. परंतु आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने कमबॅक केलं. त्याने 90 मध्ये 119 धावा ठोकल्या. दरम्यान त्याने 12 चौकार 7 षटकार लगावले. हे वनडेतील त्याचे 32 वे शतक होते. 

हेही वाचा : Live मॅच सुरु असताना मैदानावर पडला अंधार, 35 मिनिटं थांबवावा लागला सामना, भारताची नाचक्की

 

ओडिसाच्या CM सोबत रोहितचा व्हिडीओ : 

रोहित शर्माला त्याच्या दमदार परफॉर्मन्ससाठी प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. यावेळी सामना पाहण्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि त्यांचे सहकारी मंत्री सुद्धा उपस्थित होते. सामना संपल्यावर ओडिसाचे मुख्यमंत्री कर्णधार रोहित शर्माला भेटले. यावेळी दोघांनी एकमेकांना हात मिळवला तेव्हा रोहितने मजेशीर अंदाजात मुख्यमंत्र्यांचा हात हवेत उंचावला. यावेळी हे पाहून थक्क झालेल्या फॅन्सनी मैदानात जल्लोष केला. सामना संपल्यावर प्रतिक्रिया देताना रोहित शर्माने बाराबती स्टेडियमची तारीफ केली आणि हे स्टेडियम आमच्यासाठी लकी असल्याचे सांगितले.