Kokan Expressway Mumbai Goa : महाराष्ट्रात नवा सुपरफास्ट कोकण एक्स्प्रेसवे तयार होत आहे. या नव्या सुपरफास्ट कोकण एक्स्प्रेसवेमुळे मुंबई ते गोवा अंतर फक्त 6 तासात पार होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास जलद आणि सुखद होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाला टक्कर देणाऱ्या या कोकण एक्स्प्रेसवे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. अवघ्या काही महिन्यात हा एक्स्प्रेसवे प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई आणि गोवा दरम्यान नवीन महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण एक्स्प्रेसवे या नावाने हा महामार्ग ओळखला जाणार आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम 15 वर्षांपासून रखडलेले आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास त्रासदायक झाला आहे. मुंबई गोवा महामार्गााचे लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे. मुंबई गोवा महामार्गाला पर्याय म्हणून कोकण एक्सप्रेस वे उभारला जात आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई आणि गोवा दरम्यान नवीन महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण एक्स्प्रेसवे या नावाने हा महामार्ग ओळखला जाणार आहे. मुंबई ते गोवा अंतर 523 किमी आहे. मुंबई ते गोव्याला जोडणाऱ्या नवीन महामार्गामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या सहा तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या या प्रवासासाठी 12 ते 15 तास लागतात.
498 किमी लांबीचा कोकण एक्स्प्रेसवे कोकणातून जाणार आहे. 17 तालुक्यामधून हा महामार्ग जाणार आहे. संपूर्ण मार्गावर 14 इंटरचेंज असणार आहेत. यासह 871 छोटे-मोठे पूल, बोगदे, एफओबी, व्हायाडक्ट, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधा असणार आहेत.
हा एक्सप्रेस वे तीन प्रमुख जिल्ह्यांतील अनेक गावांमधून जात आहे. ज्यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. कोकण एक्सप्रेस वे अनेक गावांना कनेक्ट करणारं आहे. ज्यामध्ये प्रमुख शहरे आणि गावांचा समावेश आहे. माणगाव, पनवेल, पेण, नागोठाणे, कोलाड, इंदापूर, महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, सावरदा, संगेश्वर या गावांना एक्सप्रेस वे ची कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. गोव्यात मापुसा, पेरनेम, मडगाव, पणजी कंकोलिम आणि कॅनाकोना या गावांना हा कोकण एक्सप्रेस वे कनेक्ट होणार आहे. या महामार्गाचे काम जलद गतीने सुरु असून 95 टक्के पूर्ण झाले आहे. जून 2025 पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. 2011 पासून या कोकण एक्सप्रेस वे चे काम सुरु आहे. 498 किमी लांबीच्या या मार्गावर 41 बोगदे आणि 21 पूल आहेत.