Mobile Blast : CSMT - कल्याण लोकल ट्रेनच्या महिला डब्यात मोबाईलचा स्फोट; प्रवाशांमध्ये गोंधळ

 कल्याण लोकल ट्रेनच्या महिला डब्यात मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. 

Updated: Feb 11, 2025, 12:01 AM IST
Mobile Blast : CSMT - कल्याण लोकल ट्रेनच्या महिला डब्यात मोबाईलचा स्फोट; प्रवाशांमध्ये गोंधळ title=

Mobile Blast In Local Train : मोबाईल हा प्रत्येकासाठी जीवनावश्यक वस्तू झालाय. पण हाच मोबाईल फोन सध्या धोकादायक बनला आहे. मोबाईलचा स्फोट होण्याचे प्रकार वारंवार घडू लागलेत. मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट झाला आहे. CSMT - कल्याण लोकलच्या महिला डब्यात मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे एकच गोंधळ उडाला. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण जंक्शन प्रवासाच्या दरम्यान कळवा रेल्वे स्टेशन याठिकाणी लोकल रेल्वे महिलांच्या डब्या मध्ये एका अज्ञात महिलेचा मोबाईल फोन ब्लास्ट झाला. रेल्वे पोलीस कर्मचारी तात्काळ  घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी  फायर एक्स्टिंगुशर च्या सहाय्यान आग लगेच आटोक्यात आणली आणि परिस्थितीवर मिळवले नियंत्रण. या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. 

खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या स्फोट होऊन एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला होता. तर एक गंभीर जखमी झाला होता. भंडारा जिल्ह्यातील सिरेगाव टोला इथं ही घटना घडली होती. सुरेश संग्रामे असं मृत मुख्याध्यापकाचं नाव आहे. ते नत्थु गायकवाड यांच्यासोबत दुचाकीवरुन जात असताना अचानक त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या कपड्याला आग लागली. यात ते भाजले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र नत्थु गायकवाड हा देखील गंभीर जखमी झाला आहे.