Virat Kohli Vs Sam Konstas Fight On Ground: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेचा चौथा सामना सुरु आहे. या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत आपली बाजू भक्कम केली आहे. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोस्टासने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. 19 वर्षीय सॅम हा चौथा सर्वात कमी वयात पदार्पण करणार ऑस्ट्रेलियन खेळाडू असल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली. मात्र यावेळी एका अन्य कारणामुळेही तो चर्चेत आला. ते म्हणजे विराट कोहलीबरोबर मैदानात झालेली त्याची बाचाबाची! दरम्यान या सर्व घटनाक्रमावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shahstri) यांनी भाष्य केलं आहे.
नवव्या षटकात खांद्याला खांदा लागला असता दोघांनी रागात एकमेकांकडे वळून पाहिलं. यानंतर दोघांमध्या शाब्दिक चकमकदेखील झाली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने विराट कोहलीची चूक असल्याचं सांगितलं. याप्रकरणी आयसीसीने विराट कोहलीवर बंदी घातली नसली तरी मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला आहे. यानंतर आता रवी शास्त्री यांनी आपलं मत मांडताना विराट कोहलीच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. विराट कोहलीने रवी शास्त्री प्रशिक्षकपदी असताना सर्वाधिक काळ संघाचं नेतृत्व केलं आहे.
Virat Kohli collision with Sam Konstas 'totally unnecessary' says Ravi Shastri
Ravi Shastri not holding back pic.twitter.com/JPKnoA1hBA
— . (@Devx_07) December 26, 2024
"याची अजिबात गरज नव्हती. तुमची हे पाहण्याची इच्छा नाही. विराट हा फार सीनिअर खेळाडू आहे. तो या संघाचा कर्णधार राहिला आहे. त्याच्याकडे याप्रकरणी स्वत:चं स्पष्टीकरण असेल. पण काही गोष्टी पाहण्याची तुमची इच्छा नाही," असं रवी शास्त्री यांनी फॉक्स क्रिकेटशी संवाद साधताना सांगितलं. शास्त्री हसत हसत पुढे म्हणाले, "एक व्यक्ती जो सर्व काही करेल, तो म्हणजे अँडी पायक्रॉफ्ट". पायक्रॉफ्ट हे बॉक्सिंग डे कसोटीसाठी आयसीसीचे मॅच रेफ्री आहेत. योगायोगाने हा त्यांचा मॅच रेफ्री म्हणून 100 वा कसोटी सामना आहे.
आयसीसीने विराटची कृती हा लेव्हल 1 गुन्हा मानला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, तोच दंड मोहम्मद सिराजला ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर ट्रॅव्हिस हेड बाद झाल्यानंतर केलेल्या कृतीबद्दल ठोठावण्यात आला होता.
चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने धक्का देणं या एकमेक कृतीने लक्ष वेधलं नाही. स्टम्प माईकमध्ये विराट कोहली मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी हसून बोलू नको असं सांगताना कैद झाला आहे. दरम्यान पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावत 311 धावा केल्या आहेत.