Gautam Gambhir Love Story: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आणि माजी धडाकेबाज सलामीवीर गौतम गंभीर नेहमीच अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. गौतमने 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांमध्ये जबरदस्त खेळी करून भारताला विश्वविजेता बनवले. गौतम गंभीरची लाव स्टोरी एकदम फिल्मी आहे. गौतम त्याच्या वडिलांच्या मित्राच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. ते एक मोठे उद्योगपती आहेत. गौतम गंभीरची लव्ह स्टोरी एकदम फिल्मी आहे. त्याने लग्नासाठी भयंकर अट ठेवली होती.
खेळपट्टीवर आक्रमक दिसणारा खेळाडू वैयक्तिक आयुष्यात फारच प्रेमळ आहे. गौतम गंभीरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याची पत्नी नताशा जैन सौंदर्याच्या बाबतीत मोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकते. नताशा जैन मीडियापासून दूर असली तरी तिचा साधेपणा आणि सौंदर्य नेहमीच चर्चेचे कारण बनले आहे. गौतम गंभीरची पत्नी नताशा जैन करोडोंची मालकिन आहे. नताशा जैनचे वडील करोडपती बिझनेसमन आहेत. तिच्या वडिलांचे नाव रवींद्र जैन असे आहे.
हे ही वाचा: क्रिकेटर मोहम्मद सिराज करणार लग्न? अभिनेत्रीच्या आईने केले स्पष्ट
सुरुवातीला गंभीर आणि नताशा हे एकमेकांचे फक्त मित्र होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर गंभीरने नताशासमोर लग्नासाठी अट ठेवली. ही आत अशी होती की, २०११ चा एकदिवसीय विश्वचषक खेळल्यानंतरच तो लग्न करेल. गंभीरने एका मुलाखतीत त्याच्या या अटीबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर 28 ऑक्टोबर 2011 रोजी गंभीर आणि नताशाचे लग्न झाले.
हे ही वाचा: IND vs ENG: 'स्वत:ला 360 वेळा कानाखाली मारा...' सूर्यकुमार यादवच्या फ्लॉप शोवर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
गौतम गंभीरचे वडील दीपक गंभीर यांचे गुडगावचे प्रसिद्ध उद्योगपती आणि नताशा जैनचे वडील रवींद्र जैन यांच्याशी चांगली मैत्री होती. त्यांच्या 30 वर्षांच्या मैत्रीचे रुपांतर नात्यात झाले. गौतम गंभीर आणि नताशा जैन यांचा विवाह 28 ऑक्टोबर 2011 रोजी गुडगावमध्ये झाला होता. गौतम गंभीर आणि नताशा जैन यांना दोन मुली आहेत. गौतम गंभीरचे वडील दीपक गंभीर हे देखील कापड व्यावसायिक आहेत.