'परिस्थिती कशीही असो...' म्हणत अभिनेत्यानं पत्नीच्या नावे केली सगळी 22,50,90,10,108 रुपयांची संपत्ती

Entertainment News : अभिनेत्यानं घेतलेल्या निर्णयानं सारे हैराण. एकाही क्षणाचा विलंब न करता पत्नीच्याच नावे केली सगळी संपत्ती. लग्नानंतरच पत्नीनं घेतलेला एक निर्णय ठरला कारणीभूत...   

सायली पाटील | Updated: Jan 31, 2025, 12:22 PM IST
'परिस्थिती कशीही असो...' म्हणत अभिनेत्यानं पत्नीच्या नावे केली सगळी 22,50,90,10,108 रुपयांची संपत्ती  title=
Entertainment News, Hollywood Actor Jet Li, Jet Li Tranfer 260 Million To Wife, Jet Li Wife Nina Li Chi, Jet Li Total Net Worth, Jet Li Net Woth 260 Million, Actor Jet Li Tranfer 260 Million To Wife, जेट ली, जेट ली, अभिनेता, नेट वर्थ, हॉलिवूड, मराठी बातम्

Entertainment News : नात्यांची समीकरणं आणि कलाविश्व यांची जेव्हाजेव्हा चर्चा होते तेव्हातेव्हा काही महत्त्वाचे मुद्दे प्रकर्षानं पुढे येतात. कलाजगतामध्ये अनेकदा प्रेमाच्या वळणावर सुरू झालेली नाती मतभेद, विभक्त होणं किंवा मग घटस्फोट घेणं अशा टप्प्यांवर येऊन थांबतात. या साऱ्या परिस्थितीमध्येच नात्यांचा एक वेगळाच दृष्टीकोन एका सेलिब्रिटी जोडप्यानं सर्वांपुढे ठेवला आहे. 

कलाजगतामध्ये सध्या या सेलिब्रिटी जोडप्याचीच प्रचंड चर्चा सुरू असून, अभिनेत्यानं घेतलेल्या एका निर्णयाचं तितकंच कौतुकही होत आहे. हा अभिनेता आहे हॉलिवूड स्टार, जेट ली. त्यानं पत्नीवरील प्रेम व्यक्त करत आपली संपूर्ण संपत्ती तिच्या नावे केली आहे. 

जवळपास 37 वर्षांपासून आनंदी आणि सुखी वैवाहिक आयुष्याचा अनुभव घेणाऱ्या जेट ली यानं तब्बल 200 मिलियन डॉलर, म्हणजेच साधारण 2250 कोटी रुपये इतकी गडगंज संपत्ती पत्नीच्या नावे केली आहे. प्रेमाच्या नात्यात किंवा मुळातच नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेमच नव्हे, तर त्याग आणि समर्पणही तितकंच महत्त्वाचं असल्याचा संदेश या जोडीनं इतरांना दिला आहे. एका मुलाखतीमध्ये जेट ली यानं आपल्या या निर्णयाविषयी वक्तव्य केलं. (Jet Li Transferred 260 Million To His Wife)

पत्नीनं कायमच माझी साथ दिली आहे. परिस्थिती कशीही असो, ती कायमच माझ्यासोबत होती. जीवनातील कठीण प्रसंगातही तिची साथ मला मिळाली, असं सांगत पत्नीच आपल्या अनेक गोष्टींची काळजी घेते आणि याच कारणामुळं मी करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रीत करू शकत आहे असंही या अभिनेत्यानं मुलाखतीत सांगितलं. पत्नीच्या या समर्पणामुळेच आपण करिअरमध्ये इतकं यश मिळवू शकलो असं म्हणत तिच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे असं वक्तव्य जेट ली यानं मुलाखतीदरम्यान केलं. 

हेसुद्धा वाचा : पृथ्वी फिरायची थांबली तर? जीवसृष्टी असणाऱ्या या एकमेव ग्रहाचा वेग मंदावतोय 

पत्नीच्या नावे संपत्ती करण्याचा निर्णय आपण कोणत्याही दडपणामुळं घेतला नसून, तिच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही माझी पद्धत असल्याचं म्हणज जेट लीनं त्याच्या कृत्तातून सर्वांनाच नात्यांमध्ये प्रेमाशिवायही जोडीदाराची साथ नेमकी किती महत्त्वाची असते हेच पटवून दिलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jet Li (@jetli)

कोण आहे जेट ली ची पत्नी? 

अभिनेता जेट ली याच्या पत्नीचं नाव नीना ली असून, तिच्या नावे मिस एशिया या किताबाचीही नोंद आहे. कलाजगतामध्येही तिच्या नावाभोवती प्रसिद्धीचं वलय आहे. जेट लीसोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर तिनं सिनेसृष्टीत मुख्य प्रकाशझोतापासून स्वत:ला दूर ठेवत कुटुंबाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. फक्त पत्नी म्हणूनच नव्हे, तर जेट ली ची असिस्टंट म्हणूनही काम केलं. नीनाच्या याच समर्पणासाठी तिला पतीनं अनोख्या पद्धतीनं कृतज्ञतेची एक खास आणि तितकील मौल्यवान भेटही दिली असं म्हणणं गैर ठरणार नाही.