Gold Price Today: उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. सोन्याच्या दरात घट होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आज सोन्याने विक्रमी दर गाठला आहे. आज सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. वायदे बाजार आणि सराफा बाजारात सोनं रेकॉर्ड हायवर पोहोचलं आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
आज सकाळी 10च्या सुमारास वायदे बाजारात सोनं 147 रुपयांच्या तेजीसह 81,870 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. तर, यापूर्वी सोनं 82,200 रुपयांवर पोहोचले होते. त्याचवेळी चांदी 294 रुपयांवी वाढून 93,740 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर स्थिरावली आहे. सोनं-चांदीच्या दरात सातत्याने होणारी वाढ हे मजबूत जागतिक कल असल्याचे सांगितलं जात आहे.
सराफा बाजारादेखील आज सोन्याचे भाव वधारले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1,310 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 84,330 रुपयांवर स्थिरावली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची वाढ झाली असून 77,300 रुपयांवर प्रतितोळा दर स्थिरावले आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 980 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 63,250 रुपयांवर पोहोचले आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 77,300 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 84,330 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 63,250रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,730 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,433 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,325 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 61,840 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 67,464 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 50,600 रुपये
22 कॅरेट- 77,300 रुपये
24 कॅरेट- 84,330 रुपये
18 कॅरेट- 63,250रुपये