Tirupati temple after Australia series: भारताचा युवा स्टार खेळाडू म्हणजे नितीश रेड्डी. नितीशचा एक व्हिडीओ व्हायरल (nitish kumar reddy viral video) होत आहे. ज्यामध्ये तो तिरुपतीला पोहोचला आहे आणि तो गुडघ्यावर मंदिराच्या पायऱ्या चढून देवाचे दर्शन घेत आहे. नितीश रेड्डी यांनीही हा व्हिडीओ इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. नितीशने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारताचा पराभव झाला असला तरी नितीशने त्यांच्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. या चमकदार कामगिरीनंतर नितीश कुमार थेट तिरुपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचला. तिरुपती बालाजी मंदिरात, नितीशने फक्त अनवाणी पायानेच नाही तर गुडघ्यांच्या मदतीने मंदिराच्या पायऱ्या चढून देवाचे दर्शन घेतले.
नितीश कुमार रेड्डीला 22 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या टी-2-0 मालिकेसाठी संधी मिळाली आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही नितीशला भारतीय संघात संधी मिळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 17 ते 18 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. त्याचवेळी १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे. तर त्याचा अंतिम सामना ९ मार्चला होणार आहे.
हे ही वाचा: 'ही' सुंदरी आहे 66,000 कोटींची मालकीण, जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री पण दिला नाहीये एकही हिट चित्रपट
Nitish Kumar Reddy climbing stairs of Tirupati after scoring ton in his debut series. The peace is in the feet of Govinda pic.twitter.com/23xKmNOpaC
— Pari (@BluntIndianGal) January 13, 2025
हे ही वाचा: 'कोण आहे तो? ...' योगराज सिंहच्या 'गोळी मारण्याच्या'च्या दाव्यावर कपिल देव यांच्या प्रतिक्रियेने उडाली खळबळ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई , वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)