Kolkata Knight Riders Captain in IPL 2025 :आयपीएल 2025 साठी आता सर्वच फ्रेंचायझी त्यांच्या संघ बांधणीत व्यस्त आहेत. वर्ष अखेरीस आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन पार पडेल. 2024 च्या आयपीएल सीजनचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने जिंकले होते. यात श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून केकेआरचे नेतृत्व केले. मात्र आता आयपीएल 2025 साठी केकेआर कर्णधार बदलण्याच्या तयारीत आहेत, मीडिया रिपोर्ट्सनुसार कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीने सूर्यकुमार यादव याला केकेआरचा कर्णधार बनण्याची ऑफर दिली आहे.
सूर्यकुमार यादवला आपल्या संघात घेऊन केकेआर त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे केकेआरला चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरला मोठा धक्का बसू शकतो. पण हे आयपीएलमध्ये पहिल्यांदाच झालेले नाही. आयपीएल 2024 मध्येही मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माला बदलून गुजरात टायटन्सच्या हार्दिक पंड्याला ट्रेड करत आपल्या संघात घेऊन कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र यामुळे रोहित आणि मुंबईचे फॅन्स फ्रेंचायझी आणि हार्दिकवर नाराज झाले होते. जर केकेआरमध्येही असाच नेतृत्व बदल झाला तर त्यावर केकेआरचे फॅन्स कसे व्यक्त होतील हे पाहणं महत्वाचं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी कोलकाता नाइटराइडर्सने कर्णधार बनण्यासाठी सूर्यकुमार यादवशी संपर्क करून त्याला ऑफर दिली आहे. सूर्यकुमार हा सध्या 34 वर्षाचा आहे, तेव्हा तो अजून 5 ते 6 वर्ष आयपीएलमध्ये टीमच नेतृत्व करू शकतो. मात्र याबाबत केकेआर किंवा सूर्यकुमारकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाल्यावर टीम इंडियाच्या टी 20 क्रिकेटचे कर्णधारपद सुरुकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. सूर्यकुमार यादवपूर्वी रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. यांना सुद्धा कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधार पदाची ऑफर दिल्याचे बोलले जाते.
हेही वाचा : भारत - बांगलादेश दुसऱ्या टेस्ट मॅचवर पावसाचं सावट, सामन्यावर कसा होणार परिणाम? पाहा Weather Report
सूर्यकुमार यादव याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 150 सामने खेळले असून यात त्याने 3594 धावा केल्या. दरम्यान त्याने 2 शतक आणि 24 अर्धशतक लगावली. यासह सूर्यकुमारने 71 टी 20 सामन्यात 2432 धावा आणि 37 टेस्टमध्ये 773 धावा केल्या आहेत.