EPFO Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कायद्याच्या क्षेत्रासाठी यंग प्रोफेशनल (YP) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर त्यांचे अर्ज भरू शकतात.
उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतलेली पदवी असायला हवी. तसंच, संशोधन क्षेत्रात अनुभव असणाऱ्या एलएलबी/बीए, एलएलबी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसंच, ज्यांचे वय 32 वर्षांपर्यंत आहे ते या पदासाठी अर्ज करु शकतात. ईपीएफओच्या अधीसूचनेत म्हटलं आहे की, यंग प्रोफेशनल प्रोग्रॅमअंतर्गत, ईपीएफओच्या कायदेशीर प्रकरणांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रिमियम लॉ इन्स्टिट्यूटमधील यंग प्रोफेशनल्सना संधी देण्याची ईपीएफओची इच्छा आहे.
EPFO Recruitment 2025 साठी वयोमर्यादा
32 वर्षांपर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.
EPFO Recruitment 2025 मासिक वेतन किती असेल
या पदासाठी मासिक पगार 65,000 रुपये इतका असेल
EPFO Recruitment 2025 कसा कराल अर्ज?
उमेदवारांनी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज डाइनलोड करावा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह तो अंतिमुदतीपूर्वी yp.recruitment@epfindia.gov.in वर ईमेल करावा.
EPFO Recruitment 2025 किती दिवसांसाठी असेल नोकरी?
ईपीएफओसाठी सध्या तात्पुरत्या स्वरुपात उमेदवारांची भरती केली जाणार आहे. कंत्राटीपद्धतीने भरती केली जाणार असून निवडलेल्या उमेदवारांना 11 महिन्यांसाठी नियुक्त केले जाणार आहे.
EPFO Recruitment 2025 नोकरीचे ठिकाण?
निवडलेल्या उमेदवारांना ईपीएफओ मुख्यालय नवी दिल्लीत नियुक्त केले जाणार आहे.
EPFO Recruitment 2025 निवड कशी होणार?
या पदांसाठी मुलाखतीच्या आधारे निवड होणार आहे. कोणतीही लिखित स्वरुपात परीक्षा होणार नाही. अर्जदारांना मुलाखतीदरम्यान सर्व कागदपत्रे आणि कागदपत्रांची एक झेरॉक्स कॉपी घेऊन जावी लागणार आहे.