ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियासोबत भेदभाव? प्रॅक्टिससाठी मिळाली खराब पिच, खेळाडूंना होतेय दुखापत

IND VS AUS 4th Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथा सामना हा मेलबर्नमध्ये खेळवला जाणार असून हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया सध्या कुरापती करत असल्याचे समोर येत आहे. 

पुजा पवार | Updated: Dec 23, 2024, 01:18 PM IST
ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियासोबत भेदभाव? प्रॅक्टिससाठी मिळाली खराब पिच, खेळाडूंना होतेय दुखापत  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवली जात आहे. या टेस्ट सीरिजचे तीन सामने झाले असून यातील एका सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. तर तिसरा सामना हा ड्रॉ राहिला ज्यामुळे सीरिज सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथा सामना हा मेलबर्नमध्ये खेळवला जाणार असून हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया सध्या कुरापती करत असल्याचे समोर येत आहे. भारताचा गोलंदाज आकाश दीपने (Akash Deep) देखील याबाबत तिखट प्रतिक्रिया दिली असून भारताला सरावासाठी दिल्या जात असलेल्या पिचवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  

भारताला सरावासाठी दिली जातेय खराब पिच : 

टीम इंडियाच्या खेळाडूंना खराब पीच देऊन त्यांना दुखापत होईल असा कट ऑस्ट्रेलियाकडून केला जातोय अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. भारतीय संघाने मेलबर्नमध्ये शनिवार 19 डिसेंबर आणि रविवार 20 डिसेंबर रोजी MCG मध्ये सराव केला. या सरावा दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती त्यावेळी त्याला लगेचच फिजियोची गरज पडली. यासोबत केएल राहुल आणि आकाश दीप हे दोघेही सराव करताना दुखापतग्रस्त झाले होते. 

काय म्हणाला आकाश दीप? 

भारताचा गोलंदाज आकाश दीप याने तिसऱ्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या. मीडियाशी बोलताना आकाशने MCG येथील पीचवर प्रश्न उपस्थित केले आणि सरावासाठी देण्यात आलेली पिच ही व्हाईट बॉल क्रिकेटसाठी बनवण्यात आल्याचे सांगितले. आकाश म्हणाला, "मला वाटतं की ही विकेट व्हाईट बॉल क्रिकेटसाठी आहे. याला बाउंस कमी आहे आणि फलंदाजांसाठी बॉल सोडणं देखील अवघड ठरतंय. 

हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेड्युलबाबत मोठी अपडेट, 'या' देशात खेळवले जाणार भारताचे सामने

ऑस्ट्रेलियाला सरावासाठी वेगळी पिच? 

टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार भारत आणि ऑस्ट्रेलियाला सरावासाठी देण्यात आलेल्या पिचमध्ये खूप फरक आहे. त्यांनी दोन्ही संघांना दिलेल्या पीचचे फोटो देखील समोर आणले. सोमवारी 22 डिसेंबर रोजी टीम इंडिया ब्रेकवर होती तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने मेलबर्नमध्ये एकत्र येऊन त्यांच्या पहिल्या सत्राची नेट प्रॅक्टिस केली. ऑस्ट्रेलियाला दिलेली पीच ही पूर्णपणे वेगळी होती. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाने फ्रेश पीचवर सराव केला ज्यावर चांगली गती आणि बाउंस होता. 

MCG चे पिच क्यूरेटर काय म्हणाले? 

MCGचे पिच क्यूरेटर मॅट पॅग्सने भारतीय संघाला खराब पीच दिल्याचा आरोप फेटाळला आणि दावा केला की फ्रेश पिच ही टेस्ट सामना सुरु होण्याच्या तीन दिवसांपूर्वी दिली जाते. ते म्हणाले, "आम्हाला भारतीय संघाचे शेड्युल आधीच मिळाले होते. आम्ही सहसा सामन्याच्या तीन दिवस आधी सामना केंद्रित पिच   देतो आणि हे सर्व संघांसाठी लागू होते". 

बॉर्डर गावसकर ट्रॉफीचं वेळापत्रक : 

पहिली  टेस्‍ट: 22 ते  26 नोव्हेंबर 
दुसरी टेस्‍ट: 6 ते 10 डिसेंबर 
तिसरी टेस्‍ट: 14 ते 18 डिसेंबर 
चौथी टेस्‍ट: 26 ते 30 डिसेंबर 
पाचवी टेस्‍ट: 3 ते 7 जानेवारी

कुठे पाहता येणार सामना?

एडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार दुसरा टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरु होईल.