पुण्यातील 2 एकर जागेवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद; एकनाथ शिंदेवर भाजपचा गंभीर आरोप

पुण्यात शासकीय कर्करोग रुग्णालयाचा भूखंड बिल्डरला कवडीमोल किमतीत देण्याचा घाट गेल्याचा आरोप करण्यात आला आहे . भाजप-शिवसेनेत वादाची शक्यता आहे.शिंदेंच्या काळातील निर्णय रद्द करण्याची मागणी फडणवीसांकडे  करण्यात आली आहे.  

वनिता कांबळे | Updated: Feb 22, 2025, 09:07 PM IST
  पुण्यातील  2 एकर जागेवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद; एकनाथ शिंदेवर भाजपचा गंभीर आरोप

Maharashtra politics : पुण्यात महायुतीत एका भूखंडावरून आता वादाची ठिणगी पडली आहे. मंगळवार पेठेतील 2 एकर जागेचा वाद उफाळून आला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा भुखंड खासगी विकासकाला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपनं केलाय..तो निर्णय रद्द करण्याची मागणी आता स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केलीय. 

पुण्यातल्या ससून रुग्णालयाजवळ मंगळवार पेठेतील हि सुमारे 2 एकर मोक्याची जागा. या जागेमुळे पुण्यात शिवसेना आणि भाजपात वादाची शक्यता आहे. सध्या हा भूखंड एमएसआरडीसी म्हणजेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळच्या ताब्यात आहे. अतिशय मोक्याच्या अशा या भूखंडाची किंमत आजघडीला किमान 400 कोटी रुपये आहे. असं असताना हा शासकीय भूखंड एका खाजगी विकासकाला अवघ्या 70 कोटींमध्ये 60 वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर देण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

या भूखंडावर शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र तो डावलून हा भूखंड खासगी विकासकाला पोटभाडेकरारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप पुण्यातील भाजपने केला आहे. हा व्यवहार थांबवून तेथे प्रस्तावित कर्करोग रुग्णालय उभारावं अशी मागणी भाजपनं केलीये.

पुण्यामध्ये एकही शासकीय कर्करोग रुग्णालय नाही. ससून उपचार रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे शिंदे सरकारने घेतलेला निर्णय रद्द करून ससून परिसरातील या भूखंडावर कर्करोग रुग्णालय उभारण्यात यावं अशी मागणी होत आहे. 

क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेची पहिली इमारत ठाण्यात तयार झाली आहे.. किसननगर येथे रबर इंडिया आणि दोस्ती डेव्हलपर्सच्या भूखंडावर सिडकोकडून बांधण्यात येणाऱ्या क्लस्टरच्या पहिल्या इमारतीतील तीन विंगचे 17 मजले तयार झाले आहेत.  तर रबर इंडियाच्या इमारतीचे सहा मजले तयार झाले आहेत. या दोन्ही इमारती वर्षभरात पूर्ण होणार असून, आतापर्यंत स्वप्नवत भासणारा क्लस्टर प्रकल्प दृष्टिपथात आला आहे.