IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवली जात आहे. सीरिजमधील तिसऱ्या सामन्याला 14 डिसेंबर पासून सुरुवात झाली. परंतु या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे खराब झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी केवळ 13 ओव्हरचाच खेळ होऊ शकला. तेव्हा रविवारी होणार दुसऱ्या दिवसाचा खेळ हा ठरवलेल्या वेळेच्या अर्धातास अगोदर सुरु होणार असून त्यादिवशी ओव्हर्समध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे.
शनिवारी गाबा टेस्टला सुरुवात झाल्यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. ऑस्ट्रेलियाकडून ओपनिंग फलंदाज उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी या दोघांनी 13.2 ओव्हरमध्ये 28 धावा केल्या. तर दरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजांना एकही विकेट घेणं शक्य झालं नाही. 13 व्या ओव्हरनंतर स्टेडियम परिसरात पावसाचे आगमन झाले त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. पाऊस थांबून खेळ पुन्हा सुरु होईल याची वाट पाहिली मात्र अखेर अंपायरनी पहिला दिवस कॉल्ड ऑफ करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी सीरिजमधील पर्थ येथे झालेला पहिला सामना हा भारताने तर दुसरा सामना हा ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. ज्यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची ही सीरिज सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे.
हेही वाचा : पहिला दिवस पावसाचा! गाभा टेस्ट ड्रॉ झाली तर कोणाचा फायदा, पॉईंट्स टेबलमध्ये कसा फरक पडणार?
DAY 2 WILL START AT 5.20 AM IST AT GABBA pic.twitter.com/D3xWg6BxOM
— Johns. (CricCrazyJohns) December 14, 2024
ब्रिस्बेनमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ हा अर्धातास अगोदर म्हणजेच भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी सुरु होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी देखील पावसाची शक्यता असली तरी पहिल्या दिवसाच्या तुलनेत ती कमी आहे. जर पावसामुळे अडथळा आला नाही तर दुसऱ्या दिवशी 98 ओव्हर्स फेकल्या जातील.
एडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार दुसरा टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल.
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.