IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवली जात असून यातील तिसऱ्या सामन्याला 14 डिसेंबर पासून सुरुवात झाली. गाबा येथील टेस्ट सामन्याला सुरुवात झाली खरी परंतु पहिला दिवस हा पावसानेच गाजवला. त्यामुळे पहिल्या दिवशी केवळ 13 ओव्हरचाच सामना खेळवला जाऊ शकला. तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या पुढील दिवसांवरही पावसाचं सावट असणार आहे. तेव्हा गाभा टेस्ट ड्रॉ झाली तर त्याचा फायदा कोणत्या संघाला होणार याविषयी जाणून घेऊयात.
शनिवारी गाबा टेस्टला सुरुवात झाल्यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. ऑस्ट्रेलियाकडून ओपनिंग फलंदाज उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी या दोघांनी 13.2 ओव्हरमध्ये 28 धावा केल्या. तर दरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजांना एकही विकेट घेणं शक्य झालं नाही. 13 व्या ओव्हरनंतर स्टेडियम परिसरात पावसाचे आगमन झाले त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. पाऊस थांबून खेळ पुन्हा सुरु होईल याची वाट पाहिली मात्र अखेर अंपायरनी पहिला दिवस कॉल्ड ऑफ करण्याचा निर्णय घेतला.
ब्रिस्बेनमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जर जास्त पाऊस पडला तर ब्रिस्बेन टेस्ट ड्रॉ होऊ शकते. सध्या WTC पॉईंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका प्रथम क्रमांकावर असून त्यांची विजयाची टक्केवारी ही 63.33 इतकी आहे. तर ऑस्ट्रेलिया टेबलमध्ये दुसरा तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या खालोखाल श्रीलंका 45.45 विजयी टक्केवारीने चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या चार संघांमध्ये WTC फायनलमध्ये पोहोचण्याची शर्यत आहे.
Cricket Australia will be issuing a full refund to fans at the Gabba for Day 1 as there were less than 15 overs bowled. pic.twitter.com/iKNThYQ6zO
— Mufaddal Vohra (mufaddal_vohra) December 14, 2024
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टेस्ट सामना ड्रॉ झाला तर पॉईंट्स टेबलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे दोन पॉईंट्स कमी होतील. पण WTC पॉईंट्स टेबलमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. तिसरा सामना ड्रॉ झाला तर ऑस्ट्रेलियाचे पॉईंट्स 60.71 ने कमी होऊन 58.89 होतील. तर भारताचे पॉईंट्स 57.29 ने कमी होऊन 55.88 होतील. पण दोन्ही संघांच्या रँकिंगमध्ये बदल होणार नाहीत. दक्षिण आफ्रिका पहिल्या तर श्रीलंका चौथ्या क्रमांकावर कायम राहतील. न्यूझीलंड 45.24 टक्क्यांनी पाचव्या स्थानावर आहे. मात्र ते अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तिसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत केले तरीही ते केवळ 48. 21 टक्के गुण मिळवू शकतील, जे WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे ठरणार नाहीत.
हेही वाचा : अखेर ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 'या' देशात होणार, ICC ने घेतला मोठा निर्णय
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.