World T20I Cup 2021 | बाबर आझमचा टीम इंडियाला इशारा, तर गंभीरचं चोख उत्तर

वर्ल्ड कपमध्ये 24 ऑक्टोबरला दुबईत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत.  

Updated: Aug 18, 2021, 11:11 PM IST
World T20I Cup 2021 | बाबर आझमचा टीम इंडियाला इशारा, तर गंभीरचं चोख उत्तर title=

मुंबई : आयपीएल 2021 नंतर (IPL 2021) लगेचच टी 20 वर्ल्ड कप 2021 सुरू होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये 24 ऑक्टोबरला दुबईत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या हाय व्होल्टेज सामन्याची चाहते या  आतुरतेने वाट पाहतायेत. मात्र या सामन्याआधीच वातावरण चांगलंच तापलंय. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam)  भारताला इशारा दिला. या वरुन टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) बाबरला प्रत्युत्तर दिलं आहे. (icc t 20i world cup 2021 team india former opner gautam gambhir critisized to pakistan captain babar azam)
 
जेव्हा पाकिस्तान 24 ऑक्टोबरला आयसीसी टी -20 वर्ल्ड कपमध्ये भारताशी भिडेल, तेव्हा त्यांच्यावर खूप दबाव असेल. ग्रृप-2 चा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या ग्रृपमध्ये या दोन टीमशिवाय न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि 2 पात्र संघदेखील असणार आहेत.  

"पाकिस्तानवर दबाव असणार"
 
“भारताचा वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध 5-0 असा विक्रम आहे. त्यामुळे मला खात्री आहे की या रेकॉर्डमुळे पाकिस्तानवर प्रचंड दबाव असेल. भारतावर दबाव असेल की नाही, याबाबत आपण बोलायला नकोत. पाकिस्तानवर मात्र अधिक दबाव असेल, कारण त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं आहे", असं गंभीर म्हणाला. 

पाकिस्तानपेक्षा टीम इंडियाची कामगिरीही खूपच चांगली आहे. टी -20 मध्ये कोणीही कोणालाही पराभूत करू शकतो. आम्ही कोणत्याही टीमला गृहीत धरु शकत नाही. अफगाणिस्तानसारखी टीमही कधीकधी वरचढ ठरते. असंच काहीसं पाकिस्तानच्या बाबतीतही आहे.  पण दबाव पाकिस्तानी संघावर असेल", असं गंभीरने नमूद केलं.

बाबर काय म्हणाला होता? .

या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाचा मान भारताला मिळाला होता. मात्र कोरोना स्थितीमुळे याचे आयोजन हे यूएई आणि ओमानमध्ये करण्यात आले आहे. वर्ल्ड कपचं आयोजन हे दोन शहरात केलं गेलंय. "यूएईत  वर्ल्ड कपमधील मॅच खेळणं हे आमच्यासाठी घरच्या मैदानात खेळल्यासारखं आहे. त्यामुळे टीम इंडियाने सावध रहावं", असा इशारा बाबरने टीम इंडियाला दिला. 

टी 20 वर्ल्ड कपमधील उभयसंघांची कामगिरी

दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 5 वेळा आमनसामने भिडले आहेत. या 5 ही वेळेस टीम इंडिया पाकिस्तावर वरचढ राहिली आहे. भारताने पाकिस्तानचा पाचही सामन्यात पराभव केला होता. टी 20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना हे दोन्ही 14 सप्टेंबर 2007 ला भिडले होते. हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर बॉल आऊट द्वारे सामना निकाली काढण्यात आला. या बॉलआऊटमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं. 

अखेरचा सामना कधी?

दोन्ही संघ अखेरीस टी 20 वर्ल्ड कपमध्ये 19 मार्च 2016 मध्ये आमनेसामने आले होते. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं. 

टी-20 वर्ल्ड कप 2021साठी असे आहेत ग्रृप 

राउंड 1 

ग्रुप ए : श्रीलंका, आयरलंड, नेदरलंड आणि नामीबिया
ग्रुप बी : बांग्लादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गुएना (पीएनजी) आणि ओमन.

सुपर-12 

ग्रुप 1 : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, वेस्टइंडीज, ए1 आणि बी2
ग्रुप 2 : भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगानिस्तान, ए2 आणि बी1.