England Players Jersey: कुणाच्या अंगावर कुणाची जर्सी? इंग्लंडच्या प्लेयर्सचा अजब 'खेळ', पण कारण कौतुकास्पद!

Ashes 2023, ENG vs AUS 5th Test: अॅशेस सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचे खेळाडू चुकीची जर्सी (England  Players Jersey) घालून मैदानात उतरले. हा प्रकार पाहून समालोचक देखील अचंबित झाले. 

Updated: Jul 29, 2023, 11:42 PM IST
England  Players Jersey: कुणाच्या अंगावर कुणाची जर्सी? इंग्लंडच्या प्लेयर्सचा अजब 'खेळ', पण कारण कौतुकास्पद! title=
England Players Jersey For dementia affected people

England  Players Jersey For dementia affected people: सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( ENG vs AUS ) यांच्यात पाचवी आणि शेवटची अॅशेस मालिका खेळवली जात आहे.  केनिंग्टन ओव्हल इथे हा सामना खेळवला जातोय. या पाचव्या सामन्याच्या (ENG vs AUS 5th Test) तिसऱ्या दिवशी अजब दृष्य पहायला मिळालं. अॅशेस सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचे खेळाडू चुकीची जर्सी (England  Players Jersey) घालून मैदानात उतरले. हा प्रकार पाहून समालोचक देखील अचंबित झाले. मात्र, त्यामागील कारण आता समोर आलं आहे.

नेमकं कारण काय?

गभरात अनेक व्यक्तींना डेमेथिया (Dementia) आजाराने ग्रासले आहे. डेमेथिया आजार असलेली लोक दररोज अनेक गोष्टी विसरतात. दैनंदिन कामं देखील त्यांना नीट करता येत नाहीत. कोणती कपडे घालायची असतात, याचं भान देखील त्यांना नसतं. त्याचबरोबर सांगितलेले काम लक्षात न राहणं यापासून मोबाईल भलतीकडेच विसरणं, असा अनेक गोष्टी त्यामध्ये येतात. अशाच लोकांना  पाठिंबा देण्यासाठी इंग्लंड संघाने दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी एक दुसऱ्याची जर्सी (Jersey For dementia affected people) परिधान केली. यानंतर सोशल मीडियावर इंग्लंड संघाचे चांगलंच कौतुक होत आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया या 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आता मालिका ड्रॉ करण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू जोर लावताना दिसतायेत.  इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यांत पहिला सामना हा बर्मिंगघम इथे खेळवण्यात आला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने जिंकत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यानंतर लॉर्डस क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला धुळ चारली आणि 2-0 ने आघाडी घेतली होती. 

तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने जोरदार कमबॅक केलं अन् तिसरा सामना जिंकला. त्यामुळे मालिकेतील चुरस आणखी वाढली होती. मात्र, चौथ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या स्वप्नाची 'राख' झाली. त्यानंतर आता पाचव्या मालिकेत विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न इंग्लंडचा संघ करणार आहे. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन  

इंग्लंड 

बेन स्टोक्स (C), बॅन डकॅट, झॅक क्राउली, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (WK), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन.

ऑस्ट्रेलिया 

पॅट कमिन्स (C), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (WK), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड टॉड मर्फी, स्कॉट बोलँड, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर आणि जोश इंग्लिश.