Cricket News : भारतात इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलची (IPL) लोकप्रियता प्रचंड आहे. आयपीएलचा हंगाम म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच ठरतो. खेळाडूंवर करोडोच्या बोली लागल्या जातात, तब्बल दिड ते दोन महिने आयपीएलचा हंगाम सुरु असतो. पण आयपीएल म्हटलं की वादही आलाच. आयपीएल आणि वाद हे जणू समीकरणच बनलंय. आयपीएलबाबत अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आता भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) एका खेळाडूनही धक्कादायक आरोप केल आहे. टीम इंडिया (Team India) कमकूवत बनली असून याला आयपीएल कारणीभूत असल्याचं दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याने म्हटलं आहे. आयपीएलमध्ये खेळल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंची कमकवूत बाजू दिसून येते आणि याचा फटका त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Internation Cricket) दिसतो. आयपीएलमध्ये आपण अनेक खेळाडूंबरोबर आणि अनेक खेळाडूंच्या विरोधात खेळतो. त्यामुळे त्या खेळाडूंच्या खेळण्याची पद्धत आणि रणनिती कळते, असं रबाडा यांने म्हटलं आहे.
टी-20 (T20) आणि एकदिवसीय क्रिकेट (ODI Cricket) जवळपास सारखंच आहे. फक्त एकदिवसीय हा त्याचा दीर्घ फॉर्म आहे. रणनीती तशीच राहिली आहे आणि टी-20 पेक्षा एकदिवसीय सामन्यांमध्ये नक्कीच कमी दबाव आहे असंही रबाडा याने म्हटलं आहे.
दक्षिण आफ्रिका वि. भारत एकदिवसीय मालिका
दक्षिण आफ्रिका आणि भारतादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची (India vs South Africa ODI) मालिका खेळवली जात आहे. यात पहिला 6 ऑक्टोबरला खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 9 धावांनी पराभव केला. तर 9 ऑक्टोबरला खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात करत पराभवाचा वचपा काढला. तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये दोन्ही संघ एक-एक अशा बरोबरीत असून तिसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.