मुंबई: थ्रो करताना फिल्डरचा नेम चुकला आणि मैदानात मोठी दुर्घटना घडली. अंपायरच्या डोक्यात बॉल बसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अबुधाबी इथे टी10 लीग सुरू आहे. या लीग दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. अंपायरच्या डोक्यात बॉल जोरात बसला. त्यानंतर खेळाडू धावत अंपायरजवळ आले. त्यांनी डोक्याला लागलेला मार पाहिला. एक खेळाडू अंपायरचं डोकं चोळताना दिसत आहे.
अबुधाबीमध्ये T10 लीगच्या सामन्यात पाकिस्तानी अंपायर अलीम दार यांच्यासोबत भीषण अपघात झाला. सुदैवानं मोठी दुर्घटना घडली नाही. लाईव्ह सामन्यात फिल्डरने बॉल बॉलरकडे थ्रो केला. वेगात आलेला बॉल अंपायरच्या डोक्याला लागला.
या सामन्यात केनर लुईस आणि मोईन अली या दोन्ही नॉर्दनच्या फलंदाजांनी 19 चेंडूत 49 49 धावा केल्या. नॉर्दर्नने 10 ओवरमध्ये 152 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला केवळ 133 धावा करता आल्या आणि सामना 19 धावांनी गमवावा लागला.
या सामन्यात सर्वात भयंकर क्षण हा या दुर्देवी घटनेचा होता. सगळ्यांचाच जीव एक क्षण टांगणीला लागला होता. या दुर्घटेमध्ये अंपायर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला मार लागला. तातडीनं मैदानात डॉक्टर आले आणि त्यांनी अंपायरला तपासलं.
Aleem Dar pic.twitter.com/Zp0mL8xwj6
— Stay Cricket (@staycricket) November 24, 2021