'बीवी पाकिस्तानी फिर भी दिल है हिन्दुस्तानी', विराटपेक्षा या पठ्ठ्यानं जिंकलं मन!

IND vs PAK : पत्नीच्या हातात एक बॅनर आहे, ज्यामध्ये ‘बेटी पाकिस्तान की बहू हिंदुस्थान की’ असं लिहिलं आहे. तर दुसरीकडे नवऱ्याच्या हातात एक बॅनरही आहे, ज्यामध्ये ‘बीवी पाकिस्तानी पर दिल है हिंदुस्तानी’ असं लिहिलं आहे.

Updated: Oct 24, 2022, 12:41 AM IST
'बीवी पाकिस्तानी फिर भी दिल है हिन्दुस्तानी', विराटपेक्षा या पठ्ठ्यानं जिंकलं मन!

India Beat Pakistan : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कप (T20 world Cup) सामन्यात आज टीम इंडियाने (Team India) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (Pakistan) 4 विकेट राखून पराभव केला. हा विजय मिळवत टीम इंडियाने 2021 च्या वर्ल्ड कप सामन्यात पाकिस्तानने केलेल्या पराभवाचा बदलाच घेतलाय. टीम इंडियाच्या या विजयाने देशवासियांची दिवाळी आणखीणच गोड झाली आहे. तसेच मेलबर्नच्या या मैदानात बॅनरबाजीही पाहायला मिळाली.

मैदानात उपस्थित असलेल्या एका जोडप्याचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये दोघांनी हातात बॅनर घेतले आहेत. या फोटोवरून नवरा हिंदुस्थानी तर पत्नी पाकिस्तानी असल्याचं दिसंतय. पत्नीच्या हातात एक बॅनर आहे, ज्यामध्ये 'बेटी पाकिस्तान की बहू हिंदुस्थान की' असं लिहिलं आहे. तर दुसरीकडे नवऱ्याच्या हातात एक बॅनरही आहे. 

आणखी वाचा - भारतात दिवाळी तर पाकिस्तानात फुटले TV, पहिला व्हिडीओ समोर!

नवऱ्याने हातात घेतलेल्या बॅनरमध्ये 'बीवी पाकिस्तानी पर दिल है हिंदुस्तानी' असं मोठ्या अक्षरात लिहिलं आहे. व्हायरल फोटोमध्ये पतीने टीम इंडियाची जर्सी घातली आहे तर पत्नीने पाकिस्तानी टीमची जर्सी घातल्याचं पहायला मिळतंय. दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

पाहा फोटो - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by CricTracker (@crictracker)

दरम्यान, पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर लोळवल्यानंतर आता पुढचा सामना नेदरलँड विरुद्ध येत्या 27 ऑक्टोबरला खेळला जाईल. त्यानंतर 30 ऑक्टोबरला भारत साऊथ अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी भारताचा सामना बांग्लादेशशी होईल. त्यामुळे आता टीम इंडिया येत्या काळात चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.