भारताकडून हरल्यानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!

भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंगरूमची अशी झाली अवस्था!

Updated: Oct 24, 2022, 12:15 AM IST
 भारताकडून हरल्यानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!

Sport News : भारत आणि पाकिस्तानमधील थरारक सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. भारताने हा सामना 4 विकेट्सने जिंकला आणि आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा भारताने काढला. वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात भारताकडून झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. अशातच पराभवानंतरचा पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला आहे. भारताकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानचे खेळाडू हताश झालेले दिसत आहेत. व्हिडीओमध्ये पाकिस्तान संघाचे मुख्य कोच मॅथ्यू हेडन आणि बाबर आझम यांनी संघाला प्रोत्साहन दिलं आहे.

आपण पूर्ण प्रयत्न केले आणि काही चूकाही केल्या आहेत त्या आपल्याला सुधारायच्या आहेत. या पराभवाने खचून जाऊ नका, अजून मोठे सामने होणार आहेत. एका खेळाडूमुळे नाही आपण संघ म्हणून हरलो आहोत त्यामुळे कोणीही कोणत्या खेळाडूवर याच खापर फोडू नका, असं बाबर आझम म्हणताना दिसत आहे. 

 

स्पेशली नवाझ तू माझा मॅचविनर खेळाडू आहेस. सामन्यामध्ये खूप दडपण होतं त्यामध्येही तू पूर्ण प्रयत्न केलेस. आता काही गोष्टी इथंच सोडून जायच्या आहेत, पुढे जाऊन चांगलं प्रदर्शन करायचं आहे. आपण चांगला खेळ केला असून येणाऱ्या सामन्यांमध्ये आणखी चांगलं प्रदर्शन करायचं असल्याचंही बाबर आझम म्हणाला. पाकिस्तानचा दुसरा सामना झिम्बाब्वेसोबत असून यावेळी पाकिस्तान संघ तयारीने उतरेल.