भारत OUT! 'हे' दोन संघ खेळणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल; सामन्याची तारीखही ठरली

WTC Final 2025: सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे.

पुजा पवार | Updated: Jan 5, 2025, 11:48 AM IST
भारत OUT! 'हे' दोन संघ खेळणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल; सामन्याची तारीखही ठरली title=
(Photo Credit : Social Media)

WTC Final 2025: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज खेळवण्यात आली असून यातील शेवटचा सामना हा 3 ते 5 जानेवारी दरम्यान सिडनी येथे खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 विकेट्सने पराभव करून सीरिज 3-1  ने आघाडी घेऊन जिंकली. टीम इंडियाने तब्बल 10 वर्षांनी बॉर्डर गावसकर टेस्ट सीरिज गमावली आणि यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनलमध्ये जाण्याची संधी देखील. भारतावर दणदणीत विजय मिळवून ऑस्ट्रेलिया जून 2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी क्वालिफाय झाली आहे.

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा टेस्ट सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व जसप्रीत बुमराहने केलं होतं. बुमराहने टॉस जिंकून सुरुवातीला फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 185 धावा केल्या. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या अपहील्या इनिंगमध्ये 181 धावांवर ऑल आउट केले. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मोठं आव्हान देण्याकरता फलंदाजीसाठी उतरली खरी मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी अटॅक समोर 157 धावांवर ऑल आउट झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 158 धावांचं आव्हान मिळालं होतं, हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. यासह त्यांनी थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलचं तिकीट देखील काढलं. 

हेही वाचा : सामना हरले, सीरिज हरले, WTC फायनलमधून बाहेर पडले पण... भारतासाठी एकमेव गुडन्यूज!

टीम इंडिया WTC फायनलमधून बाहेर : 

2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला सिडनी टेस्ट जिंकणं अत्यंत महत्वाचं होतं. मात्र आता सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे. भारताविरुद्धची टेस्ट सीरिज जिंकून ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी क्वालिफाय झाली आहे. ऑस्ट्रेलिया हा WTC फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला असून यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघ WTC फायनलसाठी पहिल्या क्रमांकावर क्वालिफाय झाला होता. 

कधी रंगणार WTC फायनल? 

लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवली जाणार आहे. 11 जून 2025 पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला सुरुवात होणार असून विजेतेपदाची गदा पटकावण्याची ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस पाहायला मिळेल.