रिक्षा चालकासमोर आमिर खानला ओळखण्यास लेक जुनैदनं दिला नकार; स्वत: सांगितला मजेदार किस्सा

Aamir Khan's Son Junaid :  आमिर खानचा मुलगा जुनैद खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 7, 2025, 12:13 PM IST
रिक्षा चालकासमोर आमिर खानला ओळखण्यास लेक जुनैदनं दिला नकार; स्वत: सांगितला मजेदार किस्सा title=
(Photo Credit : Social Media)

Aamir Khan's Son Junaid : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'लवयापा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जुनैद त्याच्या वडिलांप्रमाणे अगदी सर्वसामान्य आयुष्य जगतो. इतकंच नाही तर तो कधीच लग्झरी गाडीतून फिरताना दिसत नाही तर तो रिक्षातून फिरताना दिसतो. जुनैदनं आता असा एक किस्सा सांगितला आहे ज्यात सांगितलं आहे की त्यानं एका रिक्षा चालकाकडून तो आमिर खानचा मुलगा आहे ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला होता. याचा खुलासा जुनैदनं एका मुलाखतीत केला आहे. 

जुनैदनं ही मुलाखत भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियासोबत त्यांच्या यूट्युब चॅनलला दिली होती. जुनैदनं या मुलाखतीत त्याचा एक मजेशीर किस्सा सांगितला. त्यानं सांगितलं की कशा प्रकारे तो एका रिक्षा चालकापासून त्याची स्वत: ची ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं सांगितलं की एका ट्रॅफिक सिग्नलवर त्याचे वडील अर्थात आमिर खान हे समोरा समोर आले. आमिर खान हा एका मर्सिडीजमध्ये होता. त्यानं सांगितलं की 'रिक्षा चालकाला धक्का बसला आणि त्यानं मला विचारलं की काय मी त्यांना ओळखतो, मी म्हणालो की हो आम्ही एकाच परिसरात राहतो. माझी आजी आणि त्यांची आई एका ठिकाणाहूनच आहेत.'

हे सगळं कुठे घडलं आणि संपूर्ण मजेशीर किस्सा सांगत जुनैद पुढे म्हणाला,  तो रिहर्सलसाठी अंधेरीवरून वांद्रला जात होता. तेव्हाच अचानक त्याचे वडील आमिर खान हा यशराज स्टूडियोमधून परतत होता. ट्रॅफिक सिग्नलवर आमिर खानची गाडी त्याच्या ऑटोच्या शेजारी येऊन थांबली. जुनैदचं लक्ष फोनमध्ये होतं आणि तेव्हाच आमिरचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्यानं गाडीची काच खाली केली आणि जुनैदची चौकशी केली. त्याच प्रमाणे जुनैदनं देखील आमिरची चौकशी केली. त्यानंतर जसा सिग्नल सुटला दोघं पुढे निघाले. आमिरनं स्वत: जुनैदला आवाज दिला हे पाहून रिक्षा चालकाला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. 

घरात लग्झरी गाड्या असताना रिक्षानं प्रवास का करतो असा प्रश्न विचारता जुनैद म्हणाला, हा सगळ्यात सोयिस्कर पर्याय आहे. मुंबईसारख्या शहरात रिक्षानं फिरणं हा एक योग्य पर्याय आहे कारण गाड्या या ट्रॅफिकमध्ये अडकू शकतात आणि पार्किंग शोधणं देखील कठीण होतं. त्यानं सांगितलं की अनेक लोक त्याला ओळखू शकत नाहीत. फक्त एकदा एका रिक्षा चालकानं त्याला ओळखलं होतं. 

जुनैदच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्याचा आणि खुशी कपूरचा 'लवयापा' हा रोमांटिक ड्रामा चित्रपट तमिळ चित्रपट 'लव टुडे' चा रिमेक आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.