दुबई : आशिया कपमध्ये शुक्रवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये रोमहर्षक मॅच झाली. या मॅचमध्ये पाकिस्तानचा ३ विकेटनं विजय झाला. इमाम उल हकच्या ८० रन, बाबर आझमच्या ६६ रन आणि शेवटी शोएब मलिकनं ४३ बॉलमध्ये केलेल्या ५१ रनमुळे पाकिस्ताननं २५८ रनचं लक्ष्य गाठलं. पाकिस्तानला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १० रनची आवश्यकता होती. तेव्हा शोएब मलिकनं पहिल्या बॉलला सिक्स मारली. दुसऱ्या बॉलला एकही रन आली नाही. तर तिसऱ्या बॉलला मलिकनं फोर मारून पाकिस्तानला जिंकवून दिलं. ३ बॉल उरले असताना पाकिस्तानला विजय मिळवता आला. अफगाणिस्तानच्या आफताब आलमनं शेवटची ओव्हर टाकली.
रोमांचक मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या आफताब आलमला अश्रू अनावर झाले. मैदानामध्येच आफताब आलमला रडू कोसळलं. यानंतर शोएब मलिकनं जवळ जाऊन आफताबचं सांत्वन केलं.
Shoaib Malik ... you have won my heart A man with an epic class
Stay Blessed !!!@realshoaibmalik#PAKvAFG pic.twitter.com/QdfsDtW3Ye— Ammara Awan (@Ammaraa1782) September 21, 2018
२५८ रनचा पाठलाग करताना पाकिस्तानला वारंवार धक्के लागत होते. पण इमाम उल हक आणि बाबर आझम यांनी १५४ रनची पार्टनरशीप केली. पण रनरेट कमी असल्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली होती. अखेर शोएब मलिकनं जलद रन करत पाकिस्तानला जिंकवलं.
या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. हशमतुल्लाह शाहिदीनं नाबाद ९७ रनची खेळी केली. कर्णधार अजगर अफगाणनं ५६ बॉलमध्ये ६७ रन केले. अफगाणिस्तानला शेवटच्या १० ओव्हरमध्ये ८७ रन करता आले, त्यामुळे त्यांचा स्कोअर ५० ओव्हरमध्ये २५७-५ एवढा झाला.
२५८ रनचा पाठलाग करायला आलेल्या पाकिस्तानला सुरुवातीलाच धक्के लागले. ओपनर फकर जमानला मुजीब उर रहमाननं पहिल्याच ओव्हरला आऊट केलं. पण बाबर आजम आणि इमाम उल हकनं पाकिस्तानच्या इनिंगला आकार दिला. यानंतर पाकिस्तानच्या विकेट पटापट गेल्या. हॅरिस सोहेल १३ रन, सरफराज अहमद ८ रन, असीफ अली ७ रन आणि मोहम्मद नवाज १० रनवर आऊट झाले. शेवटच्या १५ ओव्हरमध्ये पाकिस्तानला १०० रनची आवश्यकता होती. तेव्हा शोएब मलिकनं महत्त्वाची खेळी केली.