Diwali Panchang 2 november 2024 in marathi : आज बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा. नवरा बायकोमधील नातं गोड करणारा हा दिवाळीचा दिवस. आज बायको आपल्या नवऱ्याचं औक्षवान करते आणि नवरा बायकोला भेटवस्तू देतो. त्यासोबत आज गोवर्धन पूजा आहे. दिवाळीतील गोवर्धन पूजा ही भगवान श्रीकृष्णाला समर्पित करण्यात आलीय. गोवर्धनाच्या दिवशी गाय पूजेलाही विशेष महत्त्व आहे. गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त आणि राहुकाल कधी असेल ते जाणून घेऊया.
आज पंचांगानुसार (Panchang Today) आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. तर आज त्रिपुष्कर योग, आयुष्मान योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र तूळ राशीत भ्रमण करत आहे. (saturday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. शनिवार हा दिवस हनुमान आणि शनिदेवाला समर्पित आहे. अशा या शनिवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या. (saturday panchang 2 november 2024 Goverdhan Puja Muhurt Diwali Padwa panchang in marathi diwali 2024)
वार - शनिवार
तिथी - प्रथम - 20:24:09 पर्यंत
नक्षत्र - विशाखा - 29:58:48 पर्यंत
करण - किन्स्तुघ्ना - 07:24:06 पर्यंत, भाव - 20:24:09 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - आयुष्मान - 11:17:02 पर्यंत
सूर्योदय - 06:34:09
सूर्यास्त - 17:34:52
चंद्र रास - तुळ - 23:23:53 पर्यंत
चंद्रोदय - 07:09:00
चंद्रास्त - 17:52:59
ऋतु - हेमंत
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:00:43
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - कार्तिक
दुष्टमुहूर्त - 06:34:09 पासुन 07:18:11 पर्यंत, 07:18:11 पासुन 08:02:14 पर्यंत
कुलिक – 07:18:11 पासुन 08:02:14 पर्यंत
कंटक – 11:42:29 पासुन 12:26:32 पर्यंत
राहु काळ – 09:19:20 पासुन 10:41:55 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:10:35 पासुन 13:54:38 पर्यंत
यमघण्ट – 14:38:41 पासुन 15:22:44 पर्यंत
यमगण्ड – 13:27:06 पासुन 14:49:41 पर्यंत
गुलिक काळ – 06:34:09 पासुन 07:56:44 पर्यंत
या दिवाळीत पतीला ओवाळण्यासाठी संध्याकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत मुहूर्त असणार आहे.
गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त फक्त 2 तास 12 मिनिटांचा आहे.
गोवर्धन पूजेचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी 6.34 ते 8.46 पर्यंत आहे.
गोवर्धन पूजेसाठी संध्याकाळी 3.22 ते 5.34 पर्यंत शुभ मुहूर्त आहे.
प्रदोष काळात लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त - संध्याकाळी 5:35 ते रात्री 08.06 पर्यंत
अभिजीत - 11:42:29 पासुन 12:26:32 पर्यंत
पूर्व
ताराबल
भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)