Kendra Tirkon Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांचा राजकुमार बुध ठराविक काळानंतर राशिचक्र बदलतो. सध्या बुध मेष राशीत असून आज रात्री 10.26 पर्यंत या राशीत राहणार आहे.
बुध मेष राशीत असल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. बुध मेष राशीच्या चढत्या घरात स्थित आहे आणि मकर राशीच्या चौथ्या भावात म्हणजेच केंद्रस्थानी भ्रमण करत आहे. अशा स्थितीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार असून काही राशींना खूप फायदा होणार आहे. जाणून घेऊया या या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.
या राशीमध्ये नवव्या घरात केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. या काळात आर्थिक लाभासोबतच करिअर आणि बिझनेसमध्ये अफाट यश मिळू शकते. शारीरिक आणि मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. काही मोठा प्रकल्प तुमच्या वाट्याला येऊ शकतो. कर्जापासून मुक्ती मिळेल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील.
या राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राशी देखील फायदेशीर ठरू शकते. अशा स्थितीत प्रलंबित कामे पूर्ण होण्यासोबतच संपत्तीतही वाढ होईल. व्यवसायातही यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही भविष्याबाबत काही मोठे निर्णय घेऊ शकता. अविवाहितांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुमची निर्णय क्षमता वाढू शकते.
वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या विचारांनी इतरांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकता. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. एकाग्रता, ज्ञान, बुद्धी आणि विवेक जागृत होईल. प्रेमविवाह होण्याचीही शक्यता आहे. गुंतवणुकीमुळे फायदाही होऊ शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )