Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीला गजकेसरी योग! 'या' राशींच्या सुख समृद्धीसह मिळणार भरपूर नफा

Datta Jayanti 2024 Horoscope : यंदा दत्त जयंतीला गजकेसरी योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींवर दत्तात्रय यांची विशेष कृपा बरसणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Dec 13, 2024, 09:19 PM IST
Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीला गजकेसरी योग! 'या' राशींच्या सुख समृद्धीसह मिळणार भरपूर नफा  title=
Gajakesari Yoga on Datta Jayanti

Datta Jayanti 2024 Horoscope : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला दत्तात्रेय जयंती साजरी करण्यात येते. यंदा दत्तात्रेय जयंतीला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. चंद्र वृषभ राशीत प्रवेश केल्यामुळे गजकेसरी योग निर्माण झालाय. त्यासोबत दत्त जयंतीला अमृत सिद्धी योग आणि रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. या संयोगामुळे 5 राशीवर दत्ताची कृपा बरसणार आहे. 

वृषभ रास 

या राशीच्या लोकांसाठी दत्त जयंती विशेष फलदायी असणार आहे. तुम्ही तुमच्या निर्णयांवर ठाम राहाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात मित्र आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. एकत्र चांगले अभ्यास करणार आहात. व्यवसाय करणारे चांगले नफा कमावणार आहे. प्रतिस्पर्ध्यांचा मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही उदयास येणार आहात. तुम्हाला इतरांना मदत करून आनंद मिळणार आहे. ज्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. मातृपक्षाकडून काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. 

सिंह रास 

दत्त जयंतीचा दिवस या राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. या राशीचे लोकांना प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली माहिती मिळणार आहे. तुमच्या वाणीतून काम सहज होणार आहे. तुमचे उत्पन्न आणि ऐषाराम वाढ होणार आहे. तुमची बँक बॅलन्सही वाढणार आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर दत्त जयंतीचा शुभ योग जुळून आलाय. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. 

तूळ रास 

या राशीच्या लोकांसाठी दत्त जयंतीचा दिवस शुभ असणार आहे. या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. तुम्हाला सर्जनशील कार्य करणार असून त्यातून तुम्हाला नफा मिळणार आहे. जर तुम्हाला घर, जमीन आणि वाहन घ्यायचे असेल तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग खुले होणार आहे. व्यावसायिक लोकांचे सर्व लक्ष कामावर असणार आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. तुमच्या मुलांची प्रगती पाहून तुम्हालाही आनंद देणार आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले असणार आहे. 

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांसाठी दत्त जयंतीचा दिवस आनंदाचा आहे. या लोकांना सकाळपासून उत्साही वाटणार असून सर्व कामात यश प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुमची गरज असेल तेव्हा तुमचे कुटुंब तुमच्यासोबत उभं राहणार आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळणार आहे. जर तुम्ही वाहन, घर, फ्लॅट इत्यादी खरेदी करण्यासाठी बँकेच्या कर्जासाठी अर्ज तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल तर ते दत्त जयंतीचा दिवस शुभ आहे. 

कुंभ रास 

दत्त जयंतीचा दिवस या राशीच्या लोकांसाठी चांगला सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांनी कोणतेही काम हाती घेतले तरी शनिदेवाच्या कृपेने ते निश्चितच यशस्वी होणार आहे. वडिलांच्या मदतीने प्रत्येक समस्येवर उपाय मिळणार आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला नफा मिळणार आहे. तसंच, जर तुम्ही मालमत्तेच्या व्यवहाराबाबत विचार करत असाल तर त्यासाठीही दिवस उत्तम असणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)