Horoscope 8 April 2024 : आज सोमवती अमावस्यासह वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसून त्यामुळे सूतक काल वैध नसणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. अशातच आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, शुभ कार्य असो किंवा आरोग्याबद्दल कसा जाईल आजचा दिवस याबद्दल ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांनी सांगितलंय.
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. तुम्ही आज तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा बेत आखणार आहात. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी वागणुकीमुळे घरातील वातावरण हलके आणि आनंदी असणार आहे. काही लोकांना परदेशात जाण्याची संधीही मिळण्याची शक्यता आहे.
आज व्यवहारात घाई करणे तुमच्यासाठी घातक असेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस खास असणार आहे. आनंदी नातेवाईकांची संगत तुमचा तणाव कमी करणार आहे. आज पैशाचे आगमन तुम्हाला अनेक आर्थिक समस्यांपासून मुक्त करणार आहे. इतर देशांमध्ये व्यावसायिक संपर्क साधण्यासाठी हा उत्तम दिवस आहे.
आज तुम्ही खेळांमध्ये भाग घेणार असून तुमचं आरोग्य चांगल राहणार आहे. अतिरिक्त उत्पन्नासाठी तुमच्या सर्जनशील कल्पनांची मदत मिळणार आहे. घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. वैवाहिक जीवनासाठी हा दिवस खास असणार आहे.
आजची संध्याकाळ मित्रांसोबत आनंददायी जाणार आहे. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताच ठरेल. आज प्रत्येकाला तुमच्याशी मैत्री करायची असणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून सुरू केलेला प्रवास फलदायी ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून मिठी मारण्याचे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
एका मर्यादेपलीकडे स्वतःवर दबाव आणू नका आणि पुरेशी विश्रांती घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. दूरच्या नातेवाईकाकडून आलेली बातमी तुमचा दिवस बनवणार आहे. तुमच्या आयुष्यात नवीन पाहुण्याच आगमन होणार आहे. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक असणार आहे.
आज आरोग्य उत्तम राहणार आहे. आज घरातील आर्थिक अडचणी तुमच्या डोक्याला ताप देणार आहे. घरगुती जीवनात तुम्हाला काही तणावाचा सामना करावा लागणार आहे. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून काही वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ कामाचा दबाव तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण आहेत, त्या आज दूर होतील.
आज आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. हुशारीने गुंतवणूक करा. आज तुमचे काही मित्र तुमच्या घरी येऊ शकतात. डोळ्यांच्या माध्यमातून तुमच्या जोडीदाराशी आज तुम्ही बोलणार आहात.
आज डोळ्यांच्या रुग्णांनी प्रदूषित ठिकाणी जाणे टाळावे. बोलताना आणि आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील सर्व कर्जे फेडण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात.
आज स्त्री नातेवाईकामुळे घरात तणाव असणार आहे. नोकरी-व्यवसायात सहकार्याने यश मिळणार आहे. तणावांकडे दुर्लक्ष करू नका. या राशीच्या विवाहितांना आज सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. इतरांवर प्रभाव टाकण्याची तुमची क्षमता तुम्हाला अनेक सकारात्मक गोष्टी देईल.
आजचा दिवस तुम्ही शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी खेळण्यात घालवू शकता. आज तुम्हाला तुमचे पैसे खर्च करण्याची गरज नाही कारण आज घरातील वडील तुम्हाला पैसे देणार आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला विशेष वाटेल. तुमची विनोदबुद्धी तुमची सर्वात मोठी संपत्ती असणार आहे.
आज ज्या लोकांचे लग्न झाले आहे त्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खूप पैसा खर्च करावा लागणार आहे. कौटुंबिक कार्ये आणि महत्त्वाच्या प्रसंगांसाठी दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या प्रियकराच्या भावना समजून घेणार आहात. नोकरी व्यवसायाशी संबंधित या राशीचे लोक आज कामाच्या ठिकाणी त्यांच्या कौशल्याचा पुरेपूर वापर करणार आहेत.
आज तुम्ही दीर्घ आजारातून लवकर बरे होणार आहात. मात्र स्वार्थी आणि रागावलेल्या लोकांना टाळा, जे तुमच्यावर ताण आणणार आहेत. काही काळासाठी स्थगित केलेली घरगुती कामे तुमचा काही वेळ घेऊ शकतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)