Vipreet Rajyog 2025 : 50 वर्षांनंतर बुध गोचरमुळे विपरीत राजयोग, ‘या’ राशींना मिळणार अपार पैसा-पद

Vipreet Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध याचा गोचरमुळे विपरीत राजयोग निर्माण होतोय. यामुळे 3 राशीच्या लोकांना अपार पैसासोबत पद आणि प्रतिष्ठा लाभणार आहे.     

नेहा चौधरी | Updated: Feb 12, 2025, 02:33 PM IST
Vipreet Rajyog 2025 : 50 वर्षांनंतर बुध गोचरमुळे विपरीत राजयोग, ‘या’ राशींना मिळणार अपार पैसा-पद  title=

Vipreet Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आणि नक्षत्र वेळोवेळी आपली स्थिती बदलत असतात. ग्रहाच्या या स्थितीबदलामुळे काही शुभ आणि राजयोग निर्माण होत असतात. या शुभ योग आणि राजयोगाचा मानवी जीवन आणि जगावर परिणाम होतो असतो, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास सांगतात. ग्रहांचा राजकुमार बुध मावळ असून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे कुंभ राशीत शनि, सूर्य आणि बुध यांचं मिलन होणार आहे. या मिलनातून विपरीत राजयोग तयार होतोय. या राजयोगामुळे काही लोकांचं नशिब पालटणार आहे. या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती पाहिला मिळणार आहे. 

कर्क रास 

विपरीत राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. तसंच, उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमविण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. यावेळी, तुम्हाला शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये नफा मिळणार आहे. तसंच, जर तुमचे काम किंवा व्यवसाय रिअल इस्टेट, मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. व्यवसायात वाढ पाहिला मिळेल. तुमच्या योजना देखील यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 

कन्या रास 

कन्या राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोगाची निर्मिती अनुकूल असणार आहे. कारण तुमच्या गोचर कुंडलीत, करिअर आणि लग्नाचा स्वामी सहाव्या घरात स्थित असणार आहे. त्यामुळे तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. तुम्हाला आदरही वाढणार आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. घर किंवा वाहन खरेदी करण्याच्या योजना फलदायी ठरतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणार आहे. भौतिक सुखसोयींची इच्छा वा. तुम्हाला पैसे कमविण्याच्या नवीन संधी प्राप्त होणार आहे. 

धनु रास 

विपरीत राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण बुध तुमच्या गोचर कुंडलीत सातव्या आणि दहाव्या घराचा स्वामी असणार आहे. तो तिसऱ्या स्थानावर बसला आहे. म्हणून, या वेळी तुमच्या जोडीदाराची प्रगती होणार आहे. तसंच, अडकलेले पैसे परत मिळणार आहे. त्याच वेळी, तुम्ही एक नवीन योजना बनवणार आहात. मालमत्तेत वाढ होण्याचे शुभ संकेत आहेत. वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहात. नोकरदारांसाठी हा काळ चांगला आहे. तसंच यावेळी तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. तसंच, यावेळी तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होणार आहेत. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)