जजंतरम..ममंतरम...ए.मुरुगानाथम!

मंदार मुकुंद पुरकर ए.मुरुगानाथम यांचे नाव तुम्ही ऐकलं असण्याची शक्यता तशी दुरापास्तच म्हणावी लागेल. कारण मुरुगानाथम हा दाक्षिणात्या सिनेमाचा नायक, दिग्दर्शक किंवा संगीत दिग्दर्शक नसून कोयम्बतूरच्या वर्कशॉपमध्ये काम करणारा एक साधा मेकॅनिक आहे

Updated: Feb 15, 2012, 03:01 PM IST

 मंदार मुकुंद पुरकर

ए.मुरुगानाथम यांचे नाव तुम्ही ऐकलं असण्याची शक्यता तशी दुरापास्तच म्हणावी लागेल. कारण मुरुगानाथम हा दाक्षिणात्य सिनेमाचा नायक, दिग्दर्शक किंवा संगीत दिग्दर्शक नसून कोयम्बतूरच्या वर्कशॉपमध्ये काम करणारा एक साधा मेकॅनिक आहे. पण एक साधा वर्कशॉप मेकॅनिक राष्ट्रीय स्तरावर महिलांच्या सक्षमीकरणात क्रांती घडवून आणू शकतो, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही त्याला नक्कीच वेड्यात काढाल. पण ते खरं आहे.

 

काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक आळसावलेल्या दुपारी मुरुगानाथम जेवणानंतर आपल्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर सिनेमा पाहात होता.  तेव्हा त्याने पाहिलं की, त्याची पत्नी काही घाणरेडी  आणि फाटकी कापडं घेऊन जात होती. मुरुगानाथमने सहज चौकशी केली आणि त्याला धक्का बसला. मुरुगानाथमची पत्नी तिच्या मासिक पाळीकरता त्याचा उपयोग करत होती. मुरुगानाथम तिला विचारलं की यासाठी स्वच्छ कापड का वापरत नाही. तेव्हा त्याच्या पत्नीचे उत्तर होतं की आपल्याला महिन्याचं दुध परवडत नाही तर त्यासाठी पैसे कुठून आणू? या प्रश्नाचे उत्तर मुरुगानाथमकडे नव्हतं. पण त्याने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच ठरवलं आणि त्याच्या निर्धाराने त्याने अक्षरश: क्रांतिकारक बदल घडवून आणला. त्यावेळेस मुरुगानाथमला सॅनेटरी नॅपकीन म्हणजे काय असतं याची कल्पना नव्हती. जेव्हा त्याला सॅनेटरी नॅपकिनबद्दल माहिती मिळाली, तेव्हा ते आपल्या पत्नीसाठी स्वस्तात तयार करता का नाही येणार असा विचार त्याने केला.

 

मुरुगानाथम रोज संध्याकाळी वर्कशॉपमधलं वेल्डिंग गेट्स वैगरे बनविण्याचे काम संपलं की, आपल्या घराच्या मागे असलेल्या १० फूट बाय १० च्या खोलीत बराच वेळ घालवत असे.  त्याने अखेरीस एक कॉटनचा सॅनेटरी नॅपकिन बनवला. त्याने तो आपल्या पत्नीला दिला पण त्याची मेहनत वाया गेली. कारण शांतीने त्यावर टीकास्त्र सोडलं. मुरुगानाथमने बनवलेला सॅनेटरी नॅपकीन उपयोगाचा नव्हता. मुरुगानाथमने जिद्द न सोडला परत पहिल्यापासून सुरवात केली. पण त्याच्या कुटुंबातील स्त्रियांना त्याच्या या खटाटोपाची लाज वाटू लागली आणि त्यांनी कोणतीही माफी देण्यास नकार दिला.

 

मुरुगानाथमने मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने कोयम्बतूर सरकारी रुग्णालयाशीही संपर्क साधला. पण कोणीच मुरुगानाथमला गांभीर्याने घेतलं नाही. मुरुगानाथमने स्वत: बनवलेल्या नॅपकीनची परिणामकारकता तपासण्याचा मार्ग शोधून काढला. लोकांना त्याचे हे खटाटोप पाहून त्याला बहुधा वेड लागलं असावं, असा समज करुन घेतला. मुरुगानाथमची पत्नी आणि आई देखील त्याच्या या वेडापायी त्याला सोडून गेलं. मरुगानाथमला मात्र या वेडाने पुरतं झपाटून टाकलं होतं, त्याने काही महिने फक्त ब्रेड आणि साखरेवर दिवस ढकलत आपलं काम चालूच ठेवलं. त्याने एका सॅनेटरी नॅपकीनची निर्मिती करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीला पत्र लिहून त्याच्या निर्मिती संबंधित माहिती मिळवण्यासाठी पत्र लिहिलं. पाईनच्या झाडापासून बनवलेल्या धाग्यांपासून बनवलेल्या कापडाचा उपयोग नॅपकिन बनविण्यासाठी केला जातो, हे त्याला कळलं. मुरुगानाथमने नॅपकिन तयार करण्यासाठी मशीनची निर्मिती केली. त्याच्या जिद्दीला अखेर यश आल.

 

मुरुगानाथमला २००६ सालचं नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनच्या पाचव्या नॅशनल ग्रासरुटस टेक्नोलॉजिकल इनोव्हेशन्स आणि ट्रॅडिशनल नॉलेज ऍवार्डने सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान त्याला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. त्याचवर्षी त्याने पेटंटही मिळवलं. ग्रामीण भारतातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्याने ही संकल्पना वापरण्याचं ठरवलं. मुरुगानाथमच्या मशिनची किंमत ७५,००० ते तीन लाख रुपयांच्या दरम्यान आहे. स्वंयसेवी संस्था, बचत गट, राज्य सरकार आणि उद्योगसमुहांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या मदतीने त्याने भारताच्या कानाकोपऱ्यात आपली मशीन पोहचली आहेत. मुरुगानाथम महिलांना प्रशिक्षण आणि कच्च्या मालाचा पुरवठा करतो तसंच युनिट सुरु करायला सर्वतोपरी सहाय्य करतो. आज त्याची मशीन देशातील २३ राज्यांमध्ये सॅनेटरी