तुमचं इंटरनेट येणार धोक्यात... होणार बंद?

मुक्त आणि सर्वांसाठी खुले असणारे इंटरनेट हवे आहे? मग तुमच्या सरकारला ते तसेच ठेवायला सांगा!

Updated: Dec 5, 2012, 12:56 PM IST

www.24taas.com,
मुक्त आणि सर्वांसाठी खुले असणारे इंटरनेट हवे आहे? मग तुमच्या सरकारला ते तसेच ठेवायला सांगा! संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) व्यासपीठावर सुरू असलेल्या वादातील इंटरनेट कंपन्यांची बाजू मांडणारा हा संदेश "गुगल`वर झळकत आहे. "गुगल`, "मायक्रोसॉफ्ट` या बलाढ्य कंपन्यांनी या प्रस्तावाविरोधात जनमत तयार करण्यास सुरवात केली आहे.
इंटरनेट नियमनाचा फायदा चीन आणि रशियासारखे देश घेऊ शकतील, अशी भीती या दोन्ही कंपन्यांनी व्यक्त केली आहे. या परिषदेमध्ये इंटरनेटवर कडक निर्बंध लादले जातील ही भीती व्यर्थ आहे, असे "इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन`चे (आयटीयू) सचिव हॅमडन टूर यांनी सांगितले. मात्र, या परिषदेमध्ये 900 हून अधिक निर्बंधात्मक प्रस्ताव मांडले आहेत.
अमेरिकी पथकाचे प्रमुख टॅरी क्रेमर यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. "आयटीयू` ही "यूएन`ची शाखा जागतिक पातळीवरील संपर्क तंत्रज्ञानाचे निकष ठरविते. मात्र, याआधी "आयटीयू`ची बैठक 1988 मध्ये झाली होती. त्या वेळी इंटरनेट अस्तित्वात नव्हते आणि इतर संपर्काची साधनेही विकसनशील अवस्थेत होती.