व्हिडिओ : युसूफ पठाणनं प्रेक्षकाला थोबाडलं...

भारतीय क्रिकेटर युसूफ पठान यानं बडोदा आणि जम्मू काश्मीर टीम्समध्ये नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी क्रिकेट मॅच दरम्यान एका प्रेक्षक युवकाला चांगलंच थोबाडलंय. 

Updated: Dec 25, 2014, 12:26 PM IST
व्हिडिओ : युसूफ पठाणनं प्रेक्षकाला थोबाडलं... title=

वडोदरा : भारतीय क्रिकेटर युसूफ पठान यानं बडोदा आणि जम्मू काश्मीर टीम्समध्ये नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी क्रिकेट मॅच दरम्यान एका प्रेक्षक युवकाला चांगलंच थोबाडलंय. 

युसूफ रिलायन्स क्रिकेट स्टेडियममध्ये बॅटींग करत असताना त्याचं लक्ष विचित्र कमेटस् करणाऱ्या या तरुणाकडे गेलं... यामुळे, युसूफ चांगलाच तापला. वडोदरा क्रिकेट संघाचे सचिव स्नेहेल पारिख यांच्या म्हणण्यानुसार, हा तरुण प्रेक्षक मॅच सुरू असताना पठाण आणि इतर खेळाडुंबद्दल वाईट साईट बोलत होता. 

'तो ओरडत होता आणि त्याच वेळी पठाण आणि अंबाती रायुडूसारखे इतर खेळाडू बॅटींग करत होते... तेव्हा तो त्यांचा अपमान करणाऱ्या कमेटस करत होता. पठाणला या कमेंटस् जास्त काळ पचवणं कठिण गेलं... त्यामुळे आऊट झाल्यानंतर त्यानं या तरुणाला ड्रेसिंग रुममध्ये बोलावलं आणि त्याला दोन थोबाडीत ठेऊन दिल्या' असं पारिख यांनी म्हटलंय. 

त्यानंतर युसूफचा छोटा भाऊ इरफान पठाण याला याबद्दल समजलं तेव्हा त्यानं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये धाव घेतली, अशी माहिती पारिख यांनी दिलीय.

व्हिडिओ पाहा -

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.