फिरकीपटू प्रज्ञान ओझाची गोलंदाजी शैली सदोष, स्पर्धात्मक क्रिकेटमधून बाद

पाकिस्तानी गोलंदाजांपाठोपाठ आता एका भारतीय गोलंदाजाची शैलीही सदोष असल्याचं समोर आलं आहे. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझावर सदोष गोलंदाजी शैलीमुळं बीसीसीआयनं बंदी घातली आहे.

Updated: Dec 28, 2014, 12:11 PM IST
फिरकीपटू प्रज्ञान ओझाची गोलंदाजी शैली सदोष, स्पर्धात्मक क्रिकेटमधून बाद  title=

मुंबई: पाकिस्तानी गोलंदाजांपाठोपाठ आता एका भारतीय गोलंदाजाची शैलीही सदोष असल्याचं समोर आलं आहे. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझावर सदोष गोलंदाजी शैलीमुळं बीसीसीआयनं बंदी घातली आहे.

त्यामुळं ओझाला आता स्पर्धात्मक क्रिकेट सामन्यांमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. ओझाला आपल्या गोलंदाजीच्या शैलीत सुधारणा करण्यासाठी आता चेन्नईला पाठवण्यात येणार आहे. प्रज्ञान ओझा हा हैदराबादकडून स्पर्धात्मक क्रिकेट खेळतो आणि बीसीसीआयनं ओझाच्या गोलंदाजी शैलीबाबतची माहिती हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला दिली आहे.

त्यामुळं ओझाला सर्व्हिसेसविरुद्ध रणजी सामन्यापासून दूर ठेवण्यात आलं आहे. प्रज्ञान ओझाची गोलंदाजी शैली ही गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. 

ओझानं भारताकडून केवळ २४ कसोटी सामन्यांमध्ये ११३ विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. तर १८ वन डेत ओझाच्या नावावर २१ विकेट्स जमा आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.