डोपिंग चाचणी : पाकिस्तानच्या दोषी हसन रझावर बंदी

 डोपिंग चाचणीत दोषी आढल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाज हसन रझा याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या क्रिकेटपटूंच्या नमुन्यात तो दोषी आढळला. 

PTI | Updated: May 27, 2015, 09:47 AM IST
डोपिंग चाचणी : पाकिस्तानच्या दोषी हसन रझावर बंदी

कराची :  डोपिंग चाचणीत दोषी आढल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाज हसन रझा याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या क्रिकेटपटूंच्या नमुन्यात तो दोषी आढळला. 

पाकिस्तान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रझाने घेतलेल्या उत्तेजकाचे नाव सांगण्यास नकार दिला. रझा पाकिस्तानकडून एकमेव एकदिवसीय, तर १० टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. 

दोषी आढळल्यानंतर २४ मार्च रोजीच त्याला नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, त्यानंतर १४ दिवसांच्या आत त्याविषयी खुलासा करण्यास तो असमर्थ ठरल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. 

या निर्णयामुळे रझा पाक मंडळाच्यावतीने आयोजित कुठल्याच क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, तर न्यूझीलंडविरुद्ध टी २० क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.