भारत-पाकिस्तान टीमला का ठेवलं जात एकाच ग्रुपमध्ये...आयसीसीने खोललं गुपित

क्रिकेटच्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं जात. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान टीमला ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आलंय.

Updated: Jun 2, 2016, 12:10 PM IST
भारत-पाकिस्तान टीमला का ठेवलं जात एकाच ग्रुपमध्ये...आयसीसीने खोललं गुपित title=

दुबई : क्रिकेटच्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं जात. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान टीमला ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आलंय.

गतविजेता भारत संघ ४ जूनला एझबेस्टन येथे पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना खेळणार आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये का ठेवलं जात ते.

द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान संघाला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्याचा नेहमी प्रयत्न असतो. 

भारत - पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. भारत-पाकिस्तान सामन्याच्या चाहत्यांची संख्या जगभरात अधिक आहे. यामुळे स्पर्धेचा अधिक प्रचार होतो तसेच प्रसिद्धी मिळते,असे रिचर्डसन यांचे म्हणणे आहे. 

ही सलग पाचवी स्पर्धा आहे ज्यात भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलंय. या दोन्ही देशांतीला क्रिकेटचा सामना म्हणजे एक प्रकारचे युद्धच असते. या सामन्याचा प्रेक्षकवर्गही प्रचंड आहे. 

भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यासाठी आयसीसी स्पर्धेच्या वेळापत्रकामध्ये छेडछाड करत असल्याची टीका आयसीसीवर केली जात होती. मात्र आता खुद्द आयसीसीने ही गोष्ट मान्य केलीये.