क्रिकेटपटू जडेजा वादाच्या भोवऱ्यात

वाघांसोबत फोटो काढणे टीम इंडियाचा ऑलराउंडर क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला चांगलंच महागात पडलंय. गुजरातच्या गिर अभयारण्यातील त्याच्या फोटोंवरुन तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

Updated: Jun 17, 2016, 10:15 AM IST
क्रिकेटपटू जडेजा वादाच्या भोवऱ्यात title=

मुंबई : वाघांसोबत फोटो काढणे टीम इंडियाचा ऑलराउंडर क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला चांगलंच महागात पडलंय. गुजरातच्या गिर अभयारण्यातील त्याच्या फोटोंवरुन तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

मीडिया रिपोर्टनुसार, जडेजाने जिप्सीमधून वाघांच्या जवळ जाऊन फोटो काढले. हे वन कायद्याचे उल्लंघन केल्यासारखे आहे. 

जडेजा त्याची पत्नी रिवा सोलंकीसह येथे आला होता. हे दोघेही वाघांच्या समूहापासून १२-१३ फूट दूर होते. 

हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गुजरातच्या वन विभागाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत.