मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार फक्त सरकार पाडू शकतात, बनवू शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. प्रणवमुखर्जींना पाठिंबा शरद पवारांकडे बघून दिला नव्हता, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्ला चढवत भाजपचा डोळा मुंबई महापालिकेवर असल्याचं म्हटलंय. मुंबई महापालिकेवर भाजपाचा डोळा असून त्यांचं पुढं काय करायचं ते नंतर बघू असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मात्रआमची स्थिती ‘ना घर का ना घाटका’ अशी होऊ नये म्हणून विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितल्याचं ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसाठी संवाद साधताना सांगितलं.
एकीकडे चर्चेची गुऱ्हाळं सुरू ठेवा असं सांगत, जर जुळलं तर जुळलं असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी युती करणार नाहीच अशी ठाम भूमिका अजून घेतलेली नाही. दरम्यान, आजच शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपसोबत चर्चा थांबवली, असं सांगितलं होतं. पण आता पुन्हा शिवसेना-भाजप चर्चा सुरू होणार असं दिसतंय. पण याचा परिणाम भाजप सरकारच्या विश्वास मतावर काय होतो, हे पाहावं लागेल.
पाहा काय म्हणाले उद्धव -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.