शिवसेनेचे नवे प्रतोद जाहीर, विभागवार नऊ सदस्य

शिवसेनेने विधानसभा नेते आणि पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. तर, पहिल्यांदाच विभागानुसार प्रतोदपदी नऊ पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. 

Updated: Dec 17, 2014, 08:03 AM IST
शिवसेनेचे नवे प्रतोद जाहीर,  विभागवार नऊ सदस्य title=

मुंबई : शिवसेनेने विधानसभा नेते आणि पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. तर, पहिल्यांदाच विभागानुसार प्रतोदपदी नऊ पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

जनतेचे प्रश्‍न समजून घेऊन त्यांचे गांभीर्य समजावून घेण्यासाठी विभागवार पदाधिकारी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत प्रतोद म्हणून अजय चौधरी (मुंबई), प्रताप सरनाईक (ठाणे), राजन साळवी (कोकण), राजेश क्षीरसागर (कोल्हापूर), शंभूराज देसाई (पश्‍चिम महाराष्ट्र), अनिल देसाई (उत्तर महाराष्ट्र), सुभाष साबणे (मराठवाडा- नांदेड, हिंगोली, परभणी), संजय शिरसाठ (मराठवाडा- औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर), तर संजय रायमूलकर (विदर्भ) यांची निवड करण्यात आली आहे.

दादरचे आमदार सदा सरवणकर यांची खजिनदारपदी आणि हेमंत पाटील यांची सहखजिनदार पदावर निवड करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात शिवसेना नेते सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या बैठकीत या पदाधिकाऱ्यांची नावे निश्‍चित करण्यात आली होती. त्याची अधिकृत घोषणा मंगळावीर करण्यात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.